Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 12:14 PM2024-05-09T12:14:14+5:302024-05-09T12:21:17+5:30
नऊ वर्षांचा मुलगा हातात एक डॉलर घेऊन फिरत होता. त्याने एका व्यक्तीला पाहिलं, मुलाला वाटलं की हा व्यक्ती बेघर आणि गरीब आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. अशाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. एक नऊ वर्षांचा मुलगा हातात एक डॉलर घेऊन फिरत होता. त्याने एका व्यक्तीला पाहिलं, मुलाला वाटलं की हा व्यक्ती बेघर आणि गरीब आहे. मुलाला त्या व्यक्तीची दया आली आणि त्याने त्या व्यक्तीला आपल्याकडे असलेले सर्व पैसे म्हणजेच एक डॉलर दिला. पण गंमत अशी की मुलगा ज्या व्यक्तीला बेघर समजला ती व्यक्ती प्रत्यक्षात अब्जाधीश आहे. केल्विन एलिस ज्युनियर असं या मुलाचं नाव आहे. तो अमेरिकेत राहतो.
गेल्या महिन्यात तो रस्त्यावर एका व्यावसायिकाला धडकला. तो एका कॉफी शॉपच्या बाहेर उभा होता. त्याने पायजमा घातला होता. सूट-बूट नव्हते. मग तो लहान मुलगा त्याच्याकडे आला. मुलगा म्हणाला, मला नेहमीच एका बेघर व्यक्तीला मदत करायची होती आणि शेवटी ती संधी मला मिळाली. मुलाने ज्या व्यक्तीला आपला एक डॉलर दिला ती व्यक्ती बेघर नव्हती. मॅट बुसबाईस असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या अनेक कंपन्या असून त्याला कोट्यवधींचा नफा मिळत आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, फायर अलार्म वाजल्यानंतर मॅटला घाईघाईत अपार्टमेंट सोडावे लागले. तेव्हा त्याला बाहेर हा मुलगा भेटला. मॅटने सांगितलं की त्याला सकाळची प्रार्थना करायची होती आणि तो इमारतीच्या बाहेर होता. त्यामुळे तो रस्त्यावर उभा राहून प्रार्थना करू लागला. मॅट म्हणतो, 'मी हळूच डोळे उघडले आणि अचानक एक लहान मुलगा माझ्या दिशेने येत होता.'
चांगले गुण मिळाल्याने बक्षीस म्हणून डॉलर मिळाल्याचं मुलाने मॅटला सांगितलं. तो डॉलर मॅटला देऊ लागला. मुलामध्ये इतकी दया आणि माणुसकी पाहून मॅटला खूप आनंद झाला. मुलाला खूश करण्यासाठी त्याने त्याला स्नॅक्स दिला. त्याला त्याच्या दुकानात घेऊन गेला. त्याच्या वडिलांशीही बोलला. त्याने मुलाला एक ऑफर दिली की तो त्याच्या आवडीची वस्तू 40 सेकंदात तो घेऊ शकतो.