अरेरे! बर्डफ्लूमुळे कोंबड्यांना घेऊन जाताना पाहिलं; अन् तो ढसाढसा रडला, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 03:29 PM2021-01-17T15:29:30+5:302021-01-17T16:30:22+5:30
Trending Viral News in Marathi : एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला.
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने कहर केलेला दिसून येत आहे. परभणीनंतर आज मुळशी (Mulshi) तालुक्यातील नांदे येथे जिल्ह्यातील पहिला बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडला असून परिसरात खळबळ उडाली आहे. एका पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना घेऊन जाण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून पोहोचले त्यानंतर एक वेगळाच प्रकार घडला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना एका चिमुरड्याला अश्रू अनावर झाले. 'नाही नाही....' असं म्हणत हा चिमुरडा कोंबड्यांसाठी रडत होता. कारण घरातील पाळीव प्राण्यांशी लहान मुलांचे एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. अचानक कोणीही येऊन जेव्हा आपल्या घरातील प्राण्यांना घेऊन जातं. अशावेळी मनाला प्रचंड वेदना होतात.
नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीतील चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज ४ ते ५ कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. पण तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत
शुक्रवारी उशिरा त्याचा अहवाल आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूच्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देऊन जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नांदे येथील शिंदेवस्त येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सचिन काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारांवरून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.आता गायीच्या शेणापासून घर रंगवा; 'गोबर पेंटचे' गडकरींनी सांगितले ८ फायदे