तरूणानं 'आज की रात' गाण्यावर केला खतरनाक डान्स, पाहून म्हणाल - हे प्रभु हे जगन्नाथ..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 11:55 IST2025-01-04T11:54:25+5:302025-01-04T11:55:04+5:30
Boy Dance On Aaj Ki Raat Song : सध्या एका तरूणाचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. या तरूणाचा या गाण्यावरील डान्स इतका खतरनाक आहे की, बघून लोक 'वेडे' झाले आहेत.

तरूणानं 'आज की रात' गाण्यावर केला खतरनाक डान्स, पाहून म्हणाल - हे प्रभु हे जगन्नाथ..!
Boy Dance On Aaj Ki Raat Song : अभिनेत्री तमन्न भाटियाचं लोकप्रिय गाणं 'आज की रात' सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यावर शेकडो रील्स बनले आणि व्हायरल झालेत. केवळ महिलाच नाही तर अनेक पुरूषांनीही या गाण्यावर ठेका धरला. सध्या एका तरूणाचा या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. या तरूणाचा या गाण्यावरील डान्स इतका खतरनाक आहे की, बघून लोक 'वेडे' झाले आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक तरूण पॅंट-शर्ट घालून स्टेजवर 'स्त्री-2' सिनेमातील सुपरहिट गाणं 'आज की रात' वर तमन्ना भाटियासारख्या डान्स स्टेप करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे हावभावही असे आहेत की, तुम्ही स्वत:ला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर kurdiya_aarya नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ कोटी ८६ लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
तरूणाच्या या व्हिडिओवर यूजर्सच्या अनेक कमेंट्सही आहेत. एका यूजरनं कमेंट केली की, 'चांगला डान्स केला, पण तो गावातील तरूण आहे म्हणून लोक खिल्ली उडवत आहे'. दुसऱ्यानं लिहिलं की, 'मोठ्या शहरातील कोरिओग्राफर तरूण हा डान्स करतील तर चालतं. पण हा भाऊ मध्यमवर्गीय आहे म्हणून त्याची गंमत केली जात आहे'. तिसऱ्यानं लिहिलं की, 'गरीबांची तमन्ना भाटिया'.