आज कुछ तुफानी करते है! म्हणत गेला स्टंट करायला अन् असं काही झालं की रडायलाच लागला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 02:09 PM2021-08-30T14:09:08+5:302021-08-30T14:11:52+5:30
एका व्हयरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बॉटलला घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या माणसाच्या उचापत्या नंतर त्यालाच भोवल्या आहेत.
काही लोेकांना नसत्या उचापत्या करण्याची सवय असते. सध्या सोशल मिडियावरील व्हिडिओ सहज व्हायरल होत असल्याने आपणही काहीतरी करावे आणि व्हायरल व्हावे असे आअनेकांना वाटते. अशाच एका व्हयरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस बॉटलला घेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या माणसाच्या उचापत्या नंतर त्यालाच भोवल्या आहेत.
या मजेदार व्हिडीओमध्ये माणसाने काचेची बॉटल हातात घेतली आहे. या बॉटलला तो त्याच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न करतोय. हा स्टंट करताना त्याने मोबाईल कॅमेरा सुरु केला आहे.तो अशा काही आवेशात आहे की काचेची बॉटल फोडूनच टाकेल. तो काचेची बॉटल आपल्या डोक्यावर आदळतो आणि फोडण्याचा प्रयत्न हा करतो. मात्र, काचेची बॉटल टणक असल्यामुळे माणासाला त्याच्या डोक्यावर चांगलाच मार बसला आहे. त्यामुळे हा माणूस रडायला लागला आहे.
हा व्हिडिओ Gudguda Jokes या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी त्यावर वगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून त्याला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांकडून शेअर करण्यात आलं आहे.