मांजरीला फसवायला गेला, तिनं असा धडा शिकवला की लोक म्हणाली...भोग आपल्या कर्माची फळं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 11:31 AM2021-09-05T11:31:55+5:302021-09-05T11:33:40+5:30
एका महाभागाने स्वत:च्याच मांजरीच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र मांजरीने त्याला असा धडा शिकवला की तो पुरता तोंडघशी पडला.
घरातील पाळीव प्राणी म्हणजे प्राणीप्रेमींचा जीव की प्राण. या प्राण्यांना ते पोटच्या मुलाप्रमाणे जपतात. त्यांना खाऊ पिऊ घालतात. त्यांना हवे ते सर्व पदार्थ त्यांच्यासाठी हजर करतात. काही झालं तरी ते त्यांच्या तोंडचा घास हिरावत नाहीत. ते असा विचारच करु शकत नाहीत. मात्र एका महाभागाने स्वत:च्याच मांजरीच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला. मात्र मांजरीने त्याला असा धडा शिकवला की तो पुरता तोंडघशी पडला.
“Human, you deserve that” pic.twitter.com/mvVBZrhqrR
— Buitengebieden (@buitengebieden_) September 4, 2021
व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्याचवेळी, मांजर त्याच्या खांद्यावर येऊन बसली आहे. दरम्यान, हा तरुण चमच्यानं मांजरीला घास भरवण्याचं नाटक करतो. आणि ऐनवेळी ते अन्न मांजरीला न देता स्वत: खाण्याचा प्रयत्न करतो. पण तरुणानं काढलेली खोड मांजरीला बिलकुल आवडत नाही. त्यामुळे ती ताबडतोब आपल्या पंजा चमच्याला मारते आणि अन्न खाली पाडते.
@buitengebieden_ युजरनेम असणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित वापरकर्त्यानं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की, 'माणूस याच लायकीचा आहे'. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर काही वेळातचं सोशल मिडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओला ७१ हजाराहून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. त्याचबरोबर जवळपास पाच हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.