डान्समास्टर बनून शिकवायला गेला डान्स, असा तोंडावर आपटला की आयुष्यात डान्स करणं विसरुन जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 05:39 PM2021-08-29T17:39:50+5:302021-08-29T17:40:01+5:30
सध्या टीव्हीवरील ़डान्स शो मुळे तरुणांमध्येही डान्सची क्रेझ वाढली आहे. प्रत्येकाला आपण डान्समास्टरच आहोत असे वाटते. त्यानादात ते इतरांनाही डान्स शिकवायल जातात. पण एका मुलाला आपल्या मैत्रीणीला डान्स शिकवणं चांगलच भोवलं आहे.
सोशल मिडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर प्रत्येकजण आपली कला सादर करु शकतो व प्रसिद्धी मिळवू शकतो. सध्या टीव्हीवरील ़डान्स शो मुळे तरुणांमध्येही डान्सची क्रेझ वाढली आहे. प्रत्येकाला आपण डान्समास्टरच आहोत असे वाटते. त्यानादात ते इतरांनाही डान्स शिकवायल जातात. पण एका मुलाला आपल्या मैत्रीणीला डान्स शिकवणं चांगलच भोवलं आहे.
या व्हिडिओत एक मुलगा डान्स करताना दिसत आहेत. हा मुलगा मुलीला डान्सच्या स्टेप्स शिकवत आहे. यामध्ये धावत जाऊन हवेत उडी मारण्याची एक स्टेप आहे. मुलाने मुलीला ही स्टेप समजावून सांगितल्यानंतर ती करायला सांगितली. दोघेजण एकत्र डान्सची स्टेप करायला जातातही. मात्र, हवेत उडी मारण्याच्या नादात मुलीची लाथ मुलाला बसते. त्यामुळे डान्स स्टेप्स शिकवणार मुलगा धापकन् जाऊन जमिनीवर आपटतो. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही पोट धरुन हसाल.
tube.indian या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून ४६ हजारपेक्षा जास्त लोकांनी तो लाईकही केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेतय असा डान्स शिकवण्याचा प्रयत्न तुम्ही करु नका बरं नाहीतर डान्स शिकवणं राहिलं बाजूला अन् भलतंच काहीतरी होऊन बसेल.