Dangerous stunts on the bike : बापरे! चालत्या बाईकवरचा स्टंट चांगलाच अंगाशी आला; उभं राहताच दणकन आदळला, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:34 PM2021-03-27T15:34:13+5:302021-03-27T15:38:26+5:30
Dangerous stunts on the bike : या व्हिडीओत स्टंट करत असलेल्या तरूणाला पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे स्टंट्सचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. अनेकदा काही व्हिडीओ पाहून पाहणाऱ्याचे डोळे उघडेच राहतात. स्टंट करणं आणि सोशल मीडियावरून फॉलोअर्स मिळवणं, यात काही नवीन राहिलेलं नाही. पण अनेकदा याच स्टंट्समुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत (stunts) स्टंट करत असलेल्या तरूणाला पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही.
क्या आप अपने बच्चों/मित्रों के साथ ऐसा हादसा होते देख सकते हैं?
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 25, 2021
अगर नहीं? तो उन्हें ऐसी मूर्खता करने से रोकें. सुरक्षा को प्राथमिकता देना एवं यातायात नियमों का पालन करना सिखाएं.
Note - Please never let your kids/friends upload & promote such stupidity on SM. pic.twitter.com/gNFpF5AOtI
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही कधी मित्र, लहान मुलांसह असा प्रकार होताना पाहिला आहे का? नसेल पाहिला तर असा मुर्खपणा करण्यापासून त्यांना थांबवा. सुरक्षितेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा माणूस उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडीओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. महिना झाला पोटात दुखत होतं; शेवटी दवाखान्यात गेला; अन् डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला ५९ फूटांचा किडा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १४ हजारांपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं असून लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करायला सुरूवात केली आहे. तर एका युजरनं मृत्यूला आमंत्रण देत असल्याचं म्हणलं आहे. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट