VIDEO : डोक्यावर उचलून स्टंट करत होता बॉयफ्रेन्ड, बॅलन्स बिघडला आणि गर्लफ्रेन्ड पडली तोंडावर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:52 PM2022-07-08T16:52:58+5:302022-07-08T16:55:16+5:30
Stunt Gone Wrong Video: या तरूणाने समोर गर्लफ्रेन्डला बघितलं तर त्याच्या डोक्यात स्टंट करण्याचा विचार आला. त्यानंतर तो गर्लफ्रेन्डला डोक्यावर उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण होतं असं काही की, त्याने नुकसान गर्लफ्रेन्डचं होतं.
Stunt Gone Wrong Video: काही लोकांना शांतपणे बसणं काही जमत नाही. या नादात ते अनेकदा स्वत:चं नुकसान करून बसतात. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, काही तरूण आपल्या गर्लफ्रेन्डसमोर जास्त हिरोगिरी दाखवतात. हे त्यांना अनेकदा महागातही पडतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. या तरूणाने समोर गर्लफ्रेन्डला बघितलं तर त्याच्या डोक्यात स्टंट करण्याचा विचार आला. त्यानंतर तो गर्लफ्रेन्डला डोक्यावर उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण होतं असं काही की, त्याने नुकसान गर्लफ्रेन्डचं होतं.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका तरूण गर्लफ्रेन्डसोबत स्टंट करत आहे. तो गर्लफ्रेन्ड दुरून धावत येण्यास सांगतो आणि तिला दोन्ही हातांनी डोक्यावर उचलतो. काही वेळ बॅलन्स बरोबर राहतो, पण नंतर बॅलन्स बिघडतो आणि त्याची गर्लफ्रेन्ड मागच्या बाजूने खाली तोंडावर पडते.
— Funny Fail Videos (@Failvids_) April 23, 2022
हा व्हिडीओ बघून हेच शिकायला मिळतं की, जास्त उत्साहात असे स्टंट करण्यात काहीच अर्थ नाही. कोणतंही ट्रेनिंग न घेता असं काही केलं तर चांगलंच महागात पडतं. जसं या तरूणाच्या गर्लफ्रेन्डसोबत झालं. हा व्हिडीओ @Failvids_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक यावर भरपूर मजेदार कमेंट्स करत आहेत.