एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमध्ये आहे 3 फरक, जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:13 PM2023-11-10T12:13:34+5:302023-11-10T12:14:23+5:30
Brain Teaser :एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमध्ये तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. तेही 7 सेकंदाच्या आत.
Brain Teaser :सोशल मीडियावर मेंदुची कसरत करवणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो तुमचा मेंदुची परीक्षा तर घेतातच सोबतच मेंदू शार्पही करतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जीनिअस असाल तर या फोटोत काय अंतर आहे हे तुम्ही 7 सेकंदात सांगू शकाल. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमध्ये तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. तेही 7 सेकंदाच्या आत.
हे दोन्ही फोटो दिसायला अगदी एकसारखे आहेत. दोन्हींमध्ये एक मुलगी टेनिस खेळताना दिसत आहे. तिच्या शूजचा रंग पिवळा आहे. गुलाबी रंगाची टीर्शट आहे. आकाशी रंगाचा स्कर्ट आहे. हातात जांभळ्या रंगाची रॅकेट आहे. तसेच हिरव्या रंगाचा बॉल, बॅकग्राउंडमध्ये नेट आणि हिरवीगार झाडी आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी बारकाईने बघून यातील फरक शोधायचा आहे.
तर तुमच्यासमोर असलेल्या एकसारख्या दिसणाऱ्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे होते. जर तुम्ही 7 सेकंदात ते शोधले असतील तर तुमचे डोळे खरंच खूप चांगले आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही या फोटोतील फरक बघू शकता. पहिला फरक मुलीच्या हातात आहे, दुसरा तिच्या टीर्शटच्या गळ्यात आहे आणि शेवटचा फरक तिच्या शूजमध्ये आहे.