न्हाव्यानं गरिबाचा सुटाबुटातला फोटो सोशल मीडियावर टाकला, अन् १० वर्षांनी कुटुंबाला पटली ओळख
By manali.bagul | Published: December 22, 2020 02:34 PM2020-12-22T14:34:28+5:302020-12-22T14:44:28+5:30
Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही या माणसात झालेलं परिवर्तन पाहू शकता.
रस्त्यावर राहत असलेल्या बेघर माणसांचा चेहरा नेहमीच विद्रुप झालेला असतो. अशा लोकांच्या कुटुंबाचा आणि नातेवाईकांचा काहीही पत्ता नसतो. अशाच एका माणसाची सकारात्मक कहाणी समोर आली आहे. ब्राझिलमध्ये एक बेघर माणूस जेव्हा १० वर्षांनी आपल्या कुटूंबाला भेटला तेव्हा त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही या माणसात झालेलं परिवर्तन पाहू शकता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोतील व्यक्तीचे नाव जोआओ कोएल्हो गुयमारेस (Joao Coelho Guimaraes) आहे.
जोआओ तब्बल १० वर्षांनी आफल्या बहिणीला आणि आईला भेटले. त्याच्या कुटुंबाने जोआओचा मृत्यू झाला असावा असं गृहित धरलं होतं. पण इंस्ट्राग्रामवर जेव्हा एका लोबो नावाच्या व्यावसाईकाकडून जोआओ यांचा फोटो पोस्ट करण्यात आला तेव्हा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. हा व्यावसाईक मोठा न्हावी असून बार्बर सर्विसेचचे मालक सुद्धा आहे.
ही घटना समोर आल्यानंतर लोबो यांनी गुयमारेस यांना जेवणाबद्दल विचारले आणि त्यांना पोटभर जेवण दिलं. पण गुयमारेस यांनी जेवण्यास नकार दिला. इतकंच नाही तर केस कापायलाही विरोध दर्शवला. तरीसुद्धा एलेसेंड्रो लोबो यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांची दाढी, केस, मिशा कापून त्यांना आकार दिला.
नवीन कपडेसुद्धा घेऊन दिले. लोको त्यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, '' जेव्हा आम्ही या माणसाची मदत करायचा विचार केला तो दिवस आमच्यासाठी खूपच खास आणि सुंदर होता. या माणसातील परिवर्तन टिपण्यासाठी आम्ही आधी आणि नंतर एक फोटो काढला होता.'' लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर
सोशल मीडियावर हा फोटो झपाट्यानं व्हायरल झाला आणि गुयमारेस यांच्या कुटुंबियांना त्यांची ओळख पटली. १७ डिसेंबरला त्यांचे कुटुंबिय त्यांना भेटायला आले होते. लोबो यांनी सांगितले की, ''सध्या क्रिसमस आहे आणि आम्ही एका व्यक्तीच्या जीवनाला बदलू शकतो तसंच सुंदर बनवू शकतो. अशी संकल्पना आमची होती. याचा चांगला परिणाम दिसून आल्यानं आम्ही आनंदित आहोत.'' हृदयद्रावक! जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती ती; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी