VIDEO : गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक आपोआप अचानक पुढे जाऊ लागला आणि.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:37 PM2021-04-20T16:37:12+5:302021-04-20T16:38:21+5:30
झालं असं की, ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. गाडी गॅस सिलेंडरने लोड केली जात होती. त्यावेळी गाडी न्यूट्रलमध्ये होती. अशात आपोआप गाडी पुढे जाऊ लागली.
सोशल मीडियावर एक मनात धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. गॅस सिलेंडरने भरलेला एक ट्रक अचानक आपोआप पुढे जाऊ लागतो. त्यावेळी ड्रायव्हर गाडीजवळ उभा होता. ड्रायव्हरने मोठ्या मेहनतीने आणि जीवाची बाजी लावून मोठी दुर्घटना टाळली. ही घटना ब्राझीलमध्ये घडली असून सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे.
झालं असं की, ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. गाडी गॅस सिलेंडरने लोड केली जात होती. त्यावेळी गाडी न्यूट्रलमध्ये होती. अशात आपोआप गाडी पुढे जाऊ लागली आणि एकच गोंधळ उडाला. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, ड्रायव्हरजवळून ट्रक पुढे जात होता. मागे दोन लोक धावत होते. इतक्यात डायव्हर ट्रकमध्ये चढला आणि त्याने मोठा अपघात टाळला.
ट्रक थांबत असल्याचे पाहून ड्रायव्हर हैराण झाला होता. अशात त्याने जीवाची बाजी लावून ट्रकमध्ये प्रवेश मिळवला. आणि गाडीचा ब्रेक लावला. हा ब्रेक लावला गेला नसता तर समोर असलेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रक गेला असता आणि गॅस सिलेंडरचा स्फोटही झाला असता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक ड्रायव्हरचं भरभरून कौतुक करत आहेत.