VIDEO : इंजेक्शन देताच बेशुद्ध झाली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:39 PM2021-06-10T13:39:13+5:302021-06-10T13:40:42+5:30

ब्राझीलच्या मागुइला ज्यूनिअरला इंजेक्शनची भीती वाटते. तरी तो कोविडचा पहिला डोज घेण्यासाठी गेला. त्यानंतर जे झालं ते पाहून लोक हैराण झाले आहेत.

Brazilian man scared of needles feel in hospital video goes viral | VIDEO : इंजेक्शन देताच बेशुद्ध झाली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल...

VIDEO : इंजेक्शन देताच बेशुद्ध झाली ही व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल...

Next

जगभरात कोरोना वॅक्सीनेशनचं काम जोरात सुरू आहे. लोक वॅक्सीन घेतल्यावर आपले फोटो शेअर करत आहेत. इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या अनेकांचे मजेदार व्हिडीओही समोर येत आहेत. इंजेक्शनची भीती वाटणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ब्राझीलच्या मागुइला ज्यूनिअरला इंजेक्शनची भीती वाटते. तरी तो कोविडचा पहिला डोज घेण्यासाठी गेला. त्यानंतर जे झालं ते पाहून लोक हैराण झाले आहेत.

मागुइल साओ पाउलो वॅक्सीन घेण्यासाठी सेंटरला गेला होता. वॅक्सीन घेण्यासाठी मोठी लाइन लागली होती. जेव्हा मागुइलचा नंबर आला आणि त्यानंतर जे झालं ते पाहून तेथील नर्सच काय तर व्हिडीओ बघणारे लोकही हैराण झाले. एखाद्याला इंजेक्शनची इतकी भीती कशी वाटू शकते, असाही प्रश्न अनेकांना पडत आहे.  (हे पण वघा : Viral Video: लग्नात नवरीला मित्रांनी दिलं अजब गिफ्ट, बघून ती लाजली तर नवरदेवाची बोलती झाली बंद....)

नर्स जसं त्याला इंजेक्शन देतात तो थेट जमिनीवर पडतो. आजूबाजूला असलेल्या नर्सही तो खाली पडल्यावर घाबरतात. हा व्हिडीओ मागुइलच्या मित्राने रेकॉर्ड केला. त्याने नंतर सांगितलं की, त्याच्या मित्राला इंजेक्शनची भीती वाटते. हे लक्षात घेऊनच व्हिडीओ रेकॉर्ड करत होतो. जेणेकरून हा व्हिडीओ त्याला दाखवता यावा.

व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, थोड्या वेळाने तो ठिक होतो. त्याला पाणी दिलं जातं. इंजेक्शनला घाबरण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण हा प्रकार काही वेगळाच आहे. याआधी इंजेक्शनला घाबरून उत्तर प्रदेशातील एक वयोवृद्ध महिला घरात लपली होती. 
 

Web Title: Brazilian man scared of needles feel in hospital video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.