"लग्न आहे की संस्कारांची आहूती?" या जोडप्याला नाचता नाचता सप्तपदी घेताना पाहून; भडकले उद्योगपती; म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 07:21 PM2021-03-03T19:21:23+5:302021-03-03T19:25:02+5:30

Trending Viral News in Marathi : 'हे लग्न आहे की संस्कारांची आहूती? हे विसरू नका की आपण जगात पूजनीय आहात, ते केवळ आपल्या संस्कृती आणि मूल्यांमुळे.

Bride and groom dancing during phera ceremony has divided the internet see viral video | "लग्न आहे की संस्कारांची आहूती?" या जोडप्याला नाचता नाचता सप्तपदी घेताना पाहून; भडकले उद्योगपती; म्हणाले.....

"लग्न आहे की संस्कारांची आहूती?" या जोडप्याला नाचता नाचता सप्तपदी घेताना पाहून; भडकले उद्योगपती; म्हणाले.....

googlenewsNext

सोशल मीडियावर (Social Media)  एका सप्तपदी (Phera Ceremony)  सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वधू-वरांनी नृत्य करत करत सप्तपदी घेतली आहे. (Bride And Groom Dancing During Phera Ceremony)   हा व्हिडिओ ट्विटरवर बिर्ला प्रिसिजन  टेक्नोलॉजीचे (Birla Precision Technologies)  चेअरमन आणि एमडी वेदांत बिर्ला यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ अपमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

पवित्र आगीच्या सभोवतालचे समारंभ हिंदू विवाहांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. या विवाहसोहळ्यादरम्यान, वधू व वर सात वेळा आगीभोवती फिरत असताना एक  प्रार्थना करतात. बिर्ला यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वधू-वर सप्तपदी सोहळ्यादरम्यान नाचताना दिसले. हे पाहून पाहुण्यांचे चेहरेही हसतानाही दिसून येत आहेत. बापरे! नदीवर म्हशी धूवून परतताना; अचानक मागून आली मगर, काही कळायच्या आतचं घडलं असं....

व्हिडिओ पोस्ट करताना वेदांत बिर्ला यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हे लग्न आहे की संस्कारांची आहूती? हे विसरू नका की आपण जगात पूजनीय आहात, ते केवळ आपल्या संस्कृती आणि मूल्यांमुळे. आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून २४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे दृश्य घृणास्पद आणि अपमानास्पद असल्याचे म्हणले जात आहे. काय सांगता? तोंडावर मिशा उगवल्यामुळे या तरूणीला पुरूष समजताहेत लोक; गर्दीत जाताच होतं असं काही.....

Web Title: Bride and groom dancing during phera ceremony has divided the internet see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.