बाबो! लग्नातच पाहुण्यांची विचित्र मागणी, नवरा नवरीने ओलांडल्या सर्व मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:06 PM2021-08-09T12:06:38+5:302021-08-09T14:36:05+5:30
लग्नातील व्हिडिओंमध्येही काही असे कारनामे असतात की ज्यांची आपल्याला कल्पनाही करवत नाही. एका लग्नात भरमंडपातच नवरानवरीने सर्व मर्यादा ओलांडल्या. पाहुण्यांनी त्यांच्याकडे अशीकाही विचित्र मागणी केली की त्यांच्याकडे पर्यायच नव्हता.
काही वेळा असे व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) व्हायरल होतात जे पाहुन आपण बघताक्षणी थबकतो. त्यातही लग्नातील व्हिडिओंमध्येही (wedding video) काही असे कारनामे असतात की ज्यांची आपल्याला कल्पनाही करवत नाही. एका लग्नात भरमंडपातच नवरानवरीने सर्व मर्यादा ओलांडल्या. पाहुण्यांनी त्यांच्याकडे अशीकाही विचित्र मागणी केली की त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. (groom kissing bride video goes viral)
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ Witty Wedding नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की पाहुण्यांच्या आग्रहामुळे नवरदेवाला मंडपातच नवरीला किस (Kiss) करावं लागलं. नवरीने नवऱ्याला वरमाला घालताच पाहुणे जोरात ओरडायला लागतात. नवरदेवानं आपल्या नवरीला किस करावं, ही त्यांची मागणी असते. अखेरीस पाहुण्यांचा मान राखून नवरा नवरी एकमेकांना किस करतातही.
हा रोमँटिक व्हिडिओ (Romantic Video) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा वेडिंग व्हिडिओ ८० हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कमेंट करून अनेकांनी विचारलं, की लग्नात स्टेजवरच किस कोण करतं? व्हिडिओवर इतरही अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.