भर मंडपात नवरी नवरदेवाचा हात सोडून पळून गेली, पुढे जे झाले ते पाहुन नातेवाईक झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 01:38 PM2021-10-27T13:38:32+5:302021-10-27T13:38:53+5:30
भरमंडपात नवरीबाई नवरदेवाला सोडून पळाली (Bride ran away from groom) आणि त्यानंतर पुढे तिने जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले.
लग्नात सर्वांचे लक्ष असते ते नवरी आणि नवऱ्याकडे. नवरा नवरी लग्नाच्या बंधनात स्वत: ला बांधुन सातही जन्म एकत्र राहण्याचे वचन घेतात. पण समजा लग्नातच नवरी नवरदेवाचा हात सोडुन पळून गेली तर. सध्या अशा एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Bride Groom) झाला आहे, ज्यात भरमंडपात नवरीबाई नवरदेवाला सोडून पळाली (Bride ran away from groom) आणि त्यानंतर पुढे तिने जे केलं ते पाहून सर्वजण हैराण झाले (Bride gave surprise to groom).
नवरदेवाशेजारी गप्पपणे बसलेली नवरी अचानक उठते आणि नवरदेवापासून दूर पळत जाते. नवरदेवापासून दूर जात तिने जे केलं ते सर्वांसाठीच मोठं सरप्राइझ होतं. नवरदेव, नातेवाईक, पाहुणे सर्वजण नवरीकडे पाहतच राहिले. कुणीच विचार केला नव्हता की नवरीबाई असं काही करेल.
व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातीला नवरा-नवरी एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला नातेवाईकही बसलेले आहेत. अचानक एक गाणं लागतं.
बसल्या बसल्या नवरी नाचू लागते. नवरदेवाला ती धक्के मारतानाही दिसते. तेव्हा नवरदेवही लाजताना दिसतो. मग अचानक नवरी उठते आणि तिथून पळू लागते. सर्वांच्या समोर अगदी मधोमध जाते आणि डान्स करू लागते. 'पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर ती जबरदस्त परफॉर्मन्स देते.
निशिका खत्री द इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवरीबाईचा हा अंदाज सर्वांना आवडला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.