लग्नापूर्वीच नवरदेवाने जीभ टाळ्याला लावली! मुलीकडच्यांनी आधी झाडाला बांधले, मग झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:45 PM2023-06-15T15:45:00+5:302023-06-15T15:46:33+5:30
लग्नाच्या ठिकाणी वधूकडचे मंडळी आणि वराकडचे मंडळी यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. या वर्षीतील लग्नाचे शेवटचे काहीच मुहूर्त शिल्लक असल्याने आता सगळीकडे गडबड सुरू असल्याचं दिसतं आहे. उत्तर प्रदेशमधून एका लग्नासंदर्भातच एक बातमी समोर आली आहे, एका लग्नात लग्नासाठी वराती येतात. लग्न मंडपात लग्नाची गडबड सुरू असते. लग्नाची वेळ काही मिनिटांवरच येऊन ठेपते. तेवढ्यात लग्नाच्या ठिकाणी वधूकडचे मंडळी आणि वराकडचे मंडळी यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते. हे प्रखरण शेवटी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी वराला अटक केली आहे.
"लोकांना माझी लिपस्टिक पाहून...", कर्नाटकातील महिला कॉंग्रेस नेत्याने टीकाकारांना सुनावले
मिळालेली माहिती अशी, लग्न काही दिवसापूर्वीच ठरले होते. १४ जून २०२३ रोजी संध्याकाळी राम किशोर वर्मा यांच्या मुलीच्या लग्नाची मिरवणूक प्रतापगढच्या मांधाता कोतवाली येथील हरखपूर गावात जौनपूर जिल्ह्यातील सक्रा लोडा गावातून आली होती. वर अमरजीत वर्मा यांचा मुलगा रामसिंग वर्मा वराती घेऊन सकरा गावात पोहोचले होते. सायंकाळी द्वारपूजनाचा विधी संपन्न झाला.त्यांच्या लग्नाचा विधी सुरू असतानाच वधू-वरांच्या बाजूने वाद झाला. दोन्ही बाजूकडील मंडळींमध्ये वादावाद सुरू झाली.
यावेळी वधुकडच्या मंडळींना वराकडच्या मंडळीना मारहाण सुरू केली. त्यांना ओलीस ठेवले आणि वराला घराबाहेरील झाडाला दोरीने बांधले, तसेच मारहाण करून या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. मांधाता पोलीस स्टेशनचे प्रभारी पुष्पराज सिंह इतर पोलिसांसह गावात पोहोचताच त्यांना शेरवानी घातलेल्या वराला झाडाला बांधलेले दिसले. वधूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, विधींच्या दरम्यानच वराने हुंड्याची मागणी करण्यास सुरुवात केली होती यामुळे आम्ही यांना मारहाण केली.
यानंतर दोन्हीकडच्या मंडळींना पोलीस ठाण्यात आणले. वराला पोलिसांनी अटक केली. यावेळी दोन्ही बाजूचे लोक पोलीस ठाण्यात होते. मात्र, त्यांच्यात कोणताही तोडगा निघाला नाही. वराने हुंडा मागितला होता आणि त्याच्या मित्रांनीही कोणाशीतरी गैरवर्तन केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर प्रकरण वाढले आणि दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली.