जावयाला पाहताच सासऱ्यानं हातात घेतला दांडका, मानेवर रोखला आणि म्हटलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:44 PM2021-09-06T19:44:47+5:302021-09-07T15:15:19+5:30
मुलीचं लग्न म्हणजे बापाच्या आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण. जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ती दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणजे बाप भाऊक होणारच ना! पण हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. यात बापाने जावायाच्या मानेवर दांडका ठेवलाय. ऐन लग्नात असं काय झालं की बापाला हातात दांडकाच घ्यावा लागला...

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या व्हिडिओपेक्षा थोडा वेगळा आहे. वडील-मुलीच्या नात्याची सर्वात सुंदर झलक या (Rajput Wedding Video) राजपूत वेडिंग व्हिडिओमध्ये (Viral Video)पाहायला मिळतेय. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलीचे वडील हातात काठी घेऊन बसले आहेत. त्यांच्या बाजूला मुलगी आहे. तसंच मुलीची आई सुद्धा जवळच उभी आहे. मुलीचे वडील दंडूका घेऊन नवऱ्या मुलीशी म्हणजेच आपल्या जावयाशी काही बोलत आहेत.
माझी मुलगी लाडाची आहे. तिची काळजी घ्या. तिला समजून घ्या, असे नवरीचे वडील नवरदेवाला सांगताना दिसत आहे. नवरीचे वडील मानेवर काठी ठेवून बोलत असले तरी नवरदेवाला राग आलेला नाही. उलट नवरदेव शांतपणे सगळं ऐकून घेतोय. हा प्रसंग घडत असताना नवरी भावूक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नवरी तिचे डोके आपल्या वडिलांच्या डोक्यावर ठेवून रडत आहे.
हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आले असून तो witty_wedding या अकाऊंटवर पाहायला मिळेल.