बाबो! नवरी नटली अन् गावभर चर्चा झाली; एक दोन नव्हे तर तब्बल १०० किलोचा घागरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:10 PM2020-06-05T12:10:31+5:302020-06-05T12:11:20+5:30
नवरीचं हे नटणं-सजणं एका मर्यादेपर्यंत ठीक असते पण कधीकधी नवरीच्या कौतुकाऐवजी ती हास्याचं कारणही बनू शकते.
नवी दिल्ली – सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न खोळंबली असतील. पण लग्न म्हटलं की नटणं, सजणं आणि शॉपिंगही आलीच. लग्नाचा दिवस स्पेशल करण्यासाठी नवरी लग्नाचा ड्रेस निवडण्यासाठी अनेक पर्याय शोधते. डिझाईन, कलर आणि एम्ब्रॉइडरीचे घागरा निवडते, लग्नात सर्वात जास्त शोभून दिसेल आणि त्याची चर्चा होईल असा घागरा घेण्यासाठी नवरीची तारांबळ उडताना अनेकदा दिसते.
नवरीचं हे नटणं-सजणं एका मर्यादेपर्यंत ठीक असते पण कधीकधी नवरीच्या कौतुकाऐवजी ती हास्याचं कारणही बनू शकते. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानमधल्या एका नवरीच्या बाबतीत घडत आहे. जेव्हा तिच्या लग्नापेक्षा हटके घागऱ्याची चर्चा अधिक झाली. सोशल मीडियावर सध्या या नवरीचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील लग्नाचा असल्याचं समोर आलं आहे.
This Pakistani bride’s giant lehenga is breaking the internet #Bridaloutfit#Pakistanwedding 👗 pic.twitter.com/4ThE7O74om
— Phupo.com (@ComPhupo) February 24, 2020
या व्हिडीओत नवरीने घातलेला घागरा अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. त्यावर रिच क्रिस्टल अँन्ड सिल्वर स्वीक्वंस आणि थ्रेड वर्क आहे. या घागऱ्याचं व्हायरल होण्याचं कारण म्हणजे याची टेल डिझाईन आहे. जी कितीतरी फूट लांब आहे. या पोर्शनमध्ये ठेवण्यासाठी त्याठिकाणी संपूर्ण एम्ब्रॉइडरी आहे. माहितीनुसार या घागऱ्याची टेल डिझाईन आणि त्याचे वजन तब्बल १०० किलो इतके आहे.
Samaj nahi arahi...!
— KHANI 🇵🇰 ( Hafiz bhai ka 🎂 ) (@Pukhtanaaa_) February 23, 2020
Is it the bride wearing the lehnga or the lehnga wearing the bride !!?😳 https://t.co/TJlx3FKdVb
सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडीओ पाहून लोकंही हैराण झाली. हा घागरा घालून नवरी चालत कशी असेल? या गोष्टींवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. तर काही जणांनी या नवरीने घागरा घातला आहे की, घागऱ्याने नवरीला घातलं आहे अशाप्रकारे जोक्स करत आहेत. असंतर अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्या लग्नातही तिने जो वेडिंग गाऊन घातला होता त्याची लांबीही बरीच मोठी होती, यामुळे देशातच नव्हे तर परदेशी माध्यमातही ती चर्चेचा विषय बनली