भर मंडपात वराने केलं असं काही की वधुने लगावली कानशिलात, व्हिडिओ पाहुन बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:54 PM2022-04-12T15:54:01+5:302022-04-12T16:50:40+5:30
एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो, ज्याचा लोक भरपूर आनंद घेतात आणि त्याला अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करतात. मुलगा असो की मुलगी, दोघांचीही इच्छा असते की त्यांचं लग्न खूप वेगळ्या आणि खास पद्धतीने व्हावं. जेणेकरून ते सगळ्यांच्या बराच काळ लक्षात राहील. जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी विविध प्लॅन करतात.
कुणी डोंगरावर जाऊन लग्न करतं, तर कुणी मोठं हॉटेल बुक करतं. लग्नसमारंभातील विविध प्रकारचे व्हिडिओ (Viral Wedding Videos) सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, त्यातील काही व्हिडिओ खूप मजेदारही असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
तुम्ही पाहिलं असेल की लग्नांमध्ये वराला अनेकदा त्याच्या मेहुण्या त्रास देत राहातात आणि त्याची मस्करी करत राहतात. कधी मेहुणी नवरदेवाला चिडवते तर कधी मसकरी करते, पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. यामध्ये नवरदेव एका मुलीशी बोलण्यात एवढा व्यस्त होता की तो त्याच्या शेजारी बसलेल्या नवरीलाच विसरून जातो. यादरम्यान नवरीबाई त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, मात्र तो स्वतःमध्येच मग्न असतो.
हे पाहून नवरी थोडी रागवते आणि नवरदेवाच्या डोक्यात मारून त्याला आठवण करून देते की इथे मी पण आहे. यानंतर नवरदेवाला आठवतं की आपण नवरीच्या शेजारी बसलो आहोत आणि तो नवरीशेजारी जाऊन बसतो. यानंतर वधूसह सर्वजण जोरजोरात हसू लागतात. हे दृश्य पाहून तुम्हीही खळखळून हसाल.
हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर unzip.world नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत १९ दशलक्षाहून अधिकांनी पाहिला आहे, तर 8 लाख 69 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या व्हिडिओची तुलना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेशी केली आहे, तर काहींनी याला स्क्रिप्टेड म्हटलं आहे.