बोंबला! सप्तपदी घेताना भटकटला नवरदेव; मग भर मंडपात नवरीनं केलं असं काही, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 01:22 PM2020-12-13T13:22:22+5:302020-12-13T13:30:57+5:30
Viral Video in Marathi : काहीवेळानंतर नवरा आणि नवरी सप्तपदी घेण्यासाठी उठतात आणि नवरा चुकीच्या दिशेने जातो. त्यावेळी नवरी चिमटा काढल्याप्रमाणे कृती करते आणि योग्य दिशेने जाण्यासाठी इशारा करते.
लग्नाआधी माणसाला जे स्वातंत्र्य असतं. लग्नानंतर तसं स्वातंत्र्य मिळत नाही. बायकोच्या धाकात राहून किंवा संमतीने सगळी काम करावं लागतात. म्हणूनच लग्न झालं की मुलगा सुधारेल असं अनेकदा म्हटलं जातं. याचा अनुभवही अनेकदा तुम्हाला आला असेल. सोशल मीडियावर असाच एक गमतीदार व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही खूप हसायला येईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चुकीच्या दिशेने जात असलेल्या आपल्या नवऱ्याला तिनं हटके अंदाजात योग्य रस्ता दाखवला आहे.
नवरा भरकटत असल्याचं दिसताच नवरीनं त्याला योग्य मार्गावर आणलं आहे. ट्विटरवर एका पंजाबी लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. गुरुद्वारामध्ये हे लग्न होतं आहे. या व्हिडीओमध्ये पंजाबी भाषेत लग्नाचे मंत्र म्हणण्याचा आवाज येत आहे. काहीवेळानंतर नवरा आणि नवरी सप्तपदी घेण्यासाठी उठतात आणि नवरा चुकीच्या दिशेने जातो. त्यावेळी नवरी चिमटा काढल्याप्रमाणे कृती करते आणि योग्य दिशेने जाण्यासाठी इशारा करते.
First day, First Lesson😎#MarriageStory#SheIsAlwaysRight 😂 pic.twitter.com/DVeWDA37kQ
— 🇮🇳Sudhir🔗 (@seriousfunnyguy) December 10, 2020
नवरा फेरे घेताना आपला पाय उजव्या दिशेला वळवतो तेव्हा नवरी त्याचा ड्रेस पकडून हळूच त्याला खेचते आणि इशारा करते. यानंतर नवरा आपल्या डाव्या हाताच्या दिशेनं चालू लागतो. हे पाहताच आजूबाजूला उपस्थित असलेली सर्वच पाहूणे मंडळी हसूनहसून लोट पोट होतात. लग्नातील हे गमतीदार दृश्य अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. ..म्हणून भारतातल्या 'या' ठिकाणी प्रत्येकाच्या शरीरावर गोंदवतात रामाचं नाव; जाणून घ्या खास गोष्टी
आतापर्यंत ५३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तलवार त्याच्या हातात असली तरी बॉस नेहमी तिच असते, म्हणूनच बायकोला अर्धांगिनी म्हटलं जातं. अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. नादच खुळा! सुनेच्या इच्छेसाठी सासऱ्यानं थेट हेलिकॉप्टर मागवलं; पाठवणीसाठी अख्ख्या गावाची गर्दी