लग्नमंडपात या नवरीनं धरला भलताच हट्ट, तिचे नखरे पाहुन वऱ्हाडी झाले अवाक् अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:09 PM2021-08-24T18:09:24+5:302021-08-24T18:12:27+5:30
एका लग्नात असा किस्सा घडला आहे ज्यात नवरीने भलताच हट्ट धरला आहे. तो हट्ट पूर्ण झाल्यावरच नवरी लग्नासाठी उभी राहते.
लग्नाचे अनेक किस्से सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यातील मजेशीर किस्से पाहुन लोकांचा दिवस आनंदात जातो. पण एका लग्नात असा किस्सा घडला आहे ज्यात नवरीने भलताच हट्ट धरला आहे. तो हट्ट पूर्ण झाल्यावरच नवरी लग्नासाठी उभी राहते.
लग्नात नवरीची एंट्री म्हणजे सर्वात मोठं आकर्षण. सर्वांच्या नजरा नवरीच्या एंट्रीकडे लागलेल्या असतात. अशीच एक नवरी मोठ्या उत्साहात लग्नमंडपात एंट्री करते खरी पण नंतर ती प्रचंड नाराज होते आणि रागानं लाल होते. या रागाचं कारण केवळ इतकंच असतं, की एंट्रीच्या वेळी तिचं आवडतं गाणं लावलं गेलं नाही. याच कारणामुळे नवरी रागावते आणि तिथेच उभी राहते.
नवरीला शांत करण्यासाठी शेजारीच उभा असलेला भाऊ तिला समजवायला पुढे येतो आणि तिला सांगतो, की थोडी वाट बघ सगळं ठीक होईल. मात्र, आपली एंंट्री खराब झाल्याचं दुःख या नवरीच्या मनात असतं. कारण, तिला सर्वांच्या समोर पहिल्यांदा आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करायचा होता.
इन्स्टाग्रामवर द वेडिंग ब्रिगेड नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं आहे, की व्हिडिओ पाहून जाणून घ्या की नवरीनं वेन्यूमध्ये जाण्यात नकार का दिला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे.