Viral Video: घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली नवरी, मग तिचा डान्स बघून अवाक् झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:32 AM2021-12-15T11:32:20+5:302021-12-15T11:33:08+5:30

Bride On Horse Video : या व्हिडीओत नवरी घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने जबरदस्त डान्स करून लोकांचं लक्षी वेधलं. सध्या या नवरीची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे.

Bride viral video : Bride reached groom house on horse in Gaya Bihar watch video | Viral Video: घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली नवरी, मग तिचा डान्स बघून अवाक् झाले लोक

Viral Video: घोडीवर बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली नवरी, मग तिचा डान्स बघून अवाक् झाले लोक

Next

सध्या देशात लग्नाचा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ शेअर केले जात आहेत. काही व्हिडीओ इतके मजेदार आहेत की बघून लोक पोट धरून हसू लागतात. तर काही व्हिडीओ बघून थक्क व्हायला होतं. काही व्हिडीओंवर तर विश्वासच बसत नाही. अशातच बिहारच्या एका लग्नातील एक व्हिडीओ (Bride Viral Video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत नवरी घोडीवर (Bride On Horse) बसून नवरदेवाच्या घरी पोहोचली आणि तिने जबरदस्त डान्स करून लोकांचं लक्ष वेधलं. सध्या या नवरीची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे.

प्रत्येक नवरी-नवरदेवाला त्यांचं लग्न खास करायचं असतं. यासाठी ते अनेकदा असं काही करतात जे बघून थक्क व्हायला होतं. आता हेच बघा ना...गया शहरातील हे लग्न सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एक नवरी नवरदेवाला घेण्यासाठी घोडीवर बसून त्याच्या घरी गेली तेव्हा बघणारे बघतच राहिले.

असं सांगितलं जात आहे की, एअर होस्टेस अनुष्पा गुहाचं लग्न पश्चिम बंगालचा राहणारा जीत मुखर्जीसोबत ठरलं होतं. दोघांनी लग्नासाठी मोठी तयारी केली होती. पण यावेळी नवरीने जे केलं त्याची कल्पना कुणीच केली नव्हती. कारण सामान्यपणे नवरदेवच घोडीवर बसून येतो. 

सुजुआर भवनपासून नवरी घोडीवर बसून नवरदेवाला घेण्यासाठी निघाली होती. अशात नवरीला बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली. इतकंच काय तर नवरीचा हा अंदाज पाहून काही लोक आनंदाने नाचले सुद्धा. आता हा अनोखा व्हिडीओ लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 
 

Web Title: Bride viral video : Bride reached groom house on horse in Gaya Bihar watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.