VIDEO : लग्नात नवरीच्या मित्रांनी केलं असं काही, तोंडावर पडणाऱ्या नवरीला नवरदेवाने वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 11:30 AM2022-01-05T11:30:20+5:302022-01-05T11:34:10+5:30

Bride Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. ज्यात नवरीला काही लोक हवेत फेकतात आणि तेव्हाच तिचा बॅलन्स बिघडतो.

Brides awkward video goes viral on social media watch video | VIDEO : लग्नात नवरीच्या मित्रांनी केलं असं काही, तोंडावर पडणाऱ्या नवरीला नवरदेवाने वाचवलं

VIDEO : लग्नात नवरीच्या मित्रांनी केलं असं काही, तोंडावर पडणाऱ्या नवरीला नवरदेवाने वाचवलं

Next

लग्न समारंभात लोक नवरी-नवरदेवासोबत चांगली मजा-मस्ती करतात. नवरी आणि नवरदेवाचे मित्र त्यांना हवेत उचलतात आणि तेव्हा नवरी-नवरदेवांना एकमेकांच्या गळ्यात हार घालावा लागतो. पण कधी कधी ही गंमत त्यांच्यासाठी महागातही पडू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Bride Viral Video) झाला आहे.

सोशल मीडियावर लग्नातील हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. ज्यात नवरीला काही लोक हवेत फेकतात आणि तेव्हाच तिचा बॅलन्स बिघडतो. ती जमिनीवर पडणार इतक्यात नवरदेवाने तिला पकडलं. नवरदेवाने नवरीला पकडलं नसतं तर ती जमिनीवर आदळली असती. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

हा व्हायरल व्हिडीओत बघू शकता की, नवरदेवासोबतच काही लोक नवरीला हवेत फेकतात आणि तेव्हा नवरी स्वत:ला सांभाळू शकत नाही. पण नवरदेव तिला खाली पडण्यापासून वाचवतो. जमिनीवर पडतानाचे तिचे हावभाव सांगत आहेत की, ती किती घाबरली होती.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ proposalspage नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ बघून एका यूजरने लिहिलं की, 'नशीब चांगलं म्हणून ती वाचली'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, 'देवाच्या कृपेने नवरदेवाने तिला वाचवलं'.
 

Web Title: Brides awkward video goes viral on social media watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.