हनिमूनहून आनंदाने परतली अन् आता मृत्यूशी देतेय झुंज; असं काही घडलं की आयुष्य बदललं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:03 PM2023-09-19T17:03:53+5:302023-09-19T17:04:09+5:30
हनिमूनचा आनंद लुटून परत येताच आयुष्यात अचानक उलथापालथ झाली.
हनिमूनचा काळ प्रत्येक जोडप्यासाठी अतिशय रोमांचक आणि मनोरंजक असतो. कारण नव्या प्रवासाचा पाया इथूनच मजबूत होतो. मात्र, एक ब्रिटीश जोडपं हनीमूनहून परतल्यावर त्यांना इतका मोठा धक्का बसला की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 36 वर्षीय हेलेन हॅनीमन तिच्या हनिमूनचा आनंद लुटून परत येताच तिच्या आयुष्यात अचानक उलथापालथ झाली. तिला आधीच मायग्रेनचा त्रास होता, पण तिला कधीच वाटलं नव्हतं की एखादा भयंकर आजार तिला घेरेल.
जेव्हा हेलेन हॅनीमनला समजलं की तिची तब्येत बरी नाही, तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हेलेन डिप्रेशनने ग्रासल्याचे सांगितले. नैराश्याचे निदान झाल्यानंतर, हेलेन तिच्या पतीसोबत नवीन घरात राहायला गेली. जसजसा वेळ निघून गेला तसतशी तिची प्रकृती ढासळू लागली. सुरुवातीला तिला आणि तिच्या पतीला वाटलं की कदाचित ती गरोदर असावी, त्यामुळेच तिच्यासोबत हे घडत आहे. जेव्हा हेलेनची चाचणी झाली तेव्हा तसं काहीही उघड झालं नाही. त्यानंतर समस्या शोधण्यासाठी तिच्या आणखी काही चाचण्या केल्या, ज्यामध्ये हेलनला ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं.
3 वेळा आला स्ट्रोक
मिररच्या रिपोर्टनुसार, हेलेनने सांगितलं की, तिला आधी डिप्रेशनचे निदान झाले होते. डॉक्टरांनी तिला यातून बाहेर येण्यासाठी काही औषधे दिली होती. तिने ही औषधे कधीच घेतली नाहीत. आठवडाभरानंतर अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर ती झोपली. हेलेनने पुढे सांगितलं की, तेव्हा तिला स्ट्रोक आला होता. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये तिला पुन्हा दोनदा तसं झालं. तपासणी केली असता ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलेनवर 2016 मध्ये सुमारे 11 तासांची क्रॅनिओटॉमी सर्जरी झाली होती. तिला ग्रेड-3 एस्ट्रोसाइटोमा होता. त्यानंतर हेलेनला पाच केमोथेरपी सेशन घ्यावे लागले. तर रेडिओथेरपीची 33 सेशन झाली. 2022 मध्ये मेंदूत ब्लड लीक झालं, त्यामुळे तिची बोलण्याची, लिहिण्याची आणि कोणतेही काम करण्याची क्षमता कमी झाली. कोणाला ओळखताही येत नव्हतं आणि कोणाशी नीट बोलताही येत नव्हतं. तिची प्रकृती इतक्या झपाट्याने खालावत चालली होती की ती मरेल असे सर्वांना वाटत होतं.
"मला मरायचं नाही"
हेलेनच्या डोक्यात छिद्र पडलं होतं. तिने सांगितले की तिला अजूनही वारंवार झटके येतात. मात्र, उपचाराने ती अनेक वर्षे जगू शकेल, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या आजाराचे निदान होऊन आता 8 वर्षे झाली आहेत आणि हेलेन अजूनही जिवंत आहे. तिच्या कुटुंबीयांचे आभार व्यक्त करताना सांगितलं की, तिला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी तिला कुटुंबाने खूप मदत केली आहे. हेलेन शेवटी म्हणाली, 'मला मरायचं नाही, कारण मी फक्त 36 वर्षांची आहे'. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.