घरात घेण्यापुर्वी चक्क नव्या नवरीला फटके दिले जातायत, व्हिडिओ पाहुन होईल संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 02:20 PM2021-09-21T14:20:39+5:302021-09-21T14:21:35+5:30
एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नव्या नवरीला घरी येण्यापुर्वी चक्क फटके दिले जातायत...
नवी नवरी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रुप. तिच्या सोनेरी पावलांनी ती जेव्हा घरात येते तेव्हा सर्वजण तिच्या स्वागतासाठी सज्ज असतात. पण काही ठिकाणी मुलीचे स्वागत करण्याची पद्धतच नसते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नव्या नवरीला घरी येण्यापुर्वी चक्क फटके दिले जातायत...
तुम्हाला थोडं विचित्र (Weird) वाटलं असेल मात्र अनेक ठिकाणी लग्नानंतर हा खेळ खेळण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार, जेव्हा मुलगी पहिल्यांदा आपल्या सासरी येते तेव्हा तेव्हा नवरी दिराला वहिनीला काठीने मारावे लागते.या व्हिडिओमध्येही लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नवरीसोबत परंपरेनुसार दिर हा खेळ खेळत आहे. मस्करीत हा दिर आपल्या वहिनीला जोरजोरात मारू लागतो. इतक्यात शेजारी उभा असलेली नवरदेवाची आई त्याला थांबवते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओही नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर जान्हवी डॉल नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) शेअर केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की लग्नातील या सुंदर खेळाचं काय नाव आहे? या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.