भावाने चुकून फॅमिली ग्रुपवर पाठवला बीअरचा फोटो, मग जे झालं त्याचा स्क्रीनशॉट बहिणीने केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 04:34 PM2023-05-27T16:34:54+5:302023-05-27T16:37:46+5:30
Social Viral : ट्विटर यूजर सानिया धवनने तिच्या भावाचा कारनामा सोशल मीडियावर शेअर केला. त्याने चुकून फॅमिली ग्रुपवर एक बीअरचा फोटो पोस्ट केला होता.
Social Viral : आपल्या आई वडिलांना आपल्या धूम्रपानाची सवय किंवा कधी कधी ड्रिंक करण्याबाबत माहीत होणं आजच्या तरूणांसाठी सगळ्यात मोठं वाईट स्वप्न ठरेल. विचार करा की, जर तुम्ही फॅमिली ग्रुपवर चॅट करत आहात किंवा कुणालातरी मेसेज करत आहात आणि एखादा चुकीचा फोटो चुकून फॅमिली ग्रुपमध्ये गेला तर काय होईल? ट्विटर यूजर सानिया धवनने तिच्या भावाचा कारनामा सोशल मीडियावर शेअर केला. त्याने चुकून फॅमिली ग्रुपवर एक बीअरचा फोटो पोस्ट केला होता.
व्हायरल व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सानियाचा भाऊ जो मुंबई इंडियनचा फॅन आहे, त्याने एक बीअर कॅनचा फोटो पोस्ट केला. सोबतच त्याने मेसेज केला की, "मुंबई फॉर द विन... लेसगो" त्यावर लगेच दोन मिनिटांनी सानियाचे वडील 'काय?' म्हणून प्रश्न विचारला. त्यानंतर एक मिनिटाने सानियाची आई विचारते 'ती बीअर पितोस'.
जेव्हा सानियाने आपल्या भावाला विचारलं की, तो बीअरचा फोटो ग्रुपवरून का काढत नाहीये. तर तो म्हणाला की, त्याने फोटो delete for everyone ऐवजी delete for me केलाय. हेच मजेदार चॅटींग आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
No way my brother sent this on the family group 😭 pic.twitter.com/FKnrcYiu3K
— Saniya Dhawan (@SaniyaDhawan1) May 26, 2023
पोस्टच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'माझ्या भावाने हे फॅमिली ग्रुपवर पाठवलं'. पोस्ट शेअर केल्यावर पोस्टला ट्विटरवर 1.1 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. ज्यावर अनेक मजेदार कमेंट्स येत आहेत.
एका यूजरने विचारलं की, 'काय तो जिवंत आहे?'. तिसऱ्या सल्ला दिला की, 'तो म्हणू शकतो की, तो मुंबई इंडियन्सला समर्थन देत आहे. कॅन त्याच्या मित्राची आहे. तर चौथ्याने लिहिलं की, 'व्हॉट्सअॅपकड डिलीटचे दोन ऑप्शन का आहेत? माझ्यासाठी डिलीट एक स्कॅम आहे. आम्ही सुद्धा अनेकदा पकडले गेलो आहोत'.