VIDEO : म्हशींच्या कळपाने जंगलाचा राजा सिंहाची हालत केली खराब, वाचण्यासाठी झाडावर जाऊन बसला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:14 PM2022-03-14T12:14:02+5:302022-03-14T12:17:17+5:30

Viral Video : सिंहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. त्यात त्याचा रूबाब आणि खतरनाक रूप बघायला मिळतं. पण अशातच एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून तुम्ही थक्क व्हाल.

Buffalo and lion video goes viral on social media watch video | VIDEO : म्हशींच्या कळपाने जंगलाचा राजा सिंहाची हालत केली खराब, वाचण्यासाठी झाडावर जाऊन बसला आणि...

VIDEO : म्हशींच्या कळपाने जंगलाचा राजा सिंहाची हालत केली खराब, वाचण्यासाठी झाडावर जाऊन बसला आणि...

googlenewsNext

Viral Video : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहासमोर भल्या भल्या प्राण्यांची बोलती बंद होताना अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. सिंहाला बघताच जंगलातील काही प्राणी आपला रस्ता बदलतात. सिंहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. त्यात त्याचा रूबाब आणि खतरनाक रूप बघायला मिळतं. पण अशातच एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो बघून तुम्ही थक्क व्हाल.

या व्हिडीओत जंगलाच्या राजावर म्हशींचा कळप वरचढ ठरला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, म्हशीच्या कळपासमोर जंगलाचा राजा सिंहाची हालत खराब झाली आहे आणि तो घाबरून झाडावर जाऊन बसला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वाइल्ड अॅनिमल नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं आहे की, 'म्हशीच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह झाडावर चढला'.

या व्हिडीओतून हेही दिसून येतं की, एकतेमध्येच शक्ती असते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानिमित्ताने लोक एकतेची चर्चा करत आहेत. म्हशींच्या कळपाने सिंहाच्या नाकीनऊ आणले आहेत. त्यामुळे तो घाबरून झाडावर शरण घेतो. 

खाली मोठ्या प्रमाणात म्हशी दिसत आहेत. तर सिंह घाबरलेला आहे. तो झाडावर चढताना फारच घाबरलेला आहे. हा नजारा बघून लोक अवाक् झाले आहेत. कारण सिंहासारख्या खतरनाक प्राण्यालाही भीती वाटू शकते हे काही लोक पहिल्यांदाच बघत असतील. इतरवेळी सिंह समोर असलेल्या शिकारीला फाडून खातो.
 

Web Title: Buffalo and lion video goes viral on social media watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.