Viral Video: आला अंगावर घेतला शिंगावर! वळुने सायकस्वाराला हवेत चेंडुसारखे उडवुन आदळले अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:05 AM2022-02-23T11:05:43+5:302022-02-23T11:16:17+5:30

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वळुला राग येतो तेव्हा तो एका सायकलस्वारासोबत काय करतो.

bull attacks cyclist and toss him in air video goes viral on internet | Viral Video: आला अंगावर घेतला शिंगावर! वळुने सायकस्वाराला हवेत चेंडुसारखे उडवुन आदळले अन् मग...

Viral Video: आला अंगावर घेतला शिंगावर! वळुने सायकस्वाराला हवेत चेंडुसारखे उडवुन आदळले अन् मग...

googlenewsNext

एखादा वळु अतिशय भडकलेला असेल तर तो किती घातक ठरू शकतो याचं उदाहरण देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वळुला राग येतो तेव्हा तो एका सायकलस्वारासोबत काय करतो.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक सायकल रेसिंग सुरू होती. यादरम्यान सायकिलिस्टसमोर एक वळु आला. हा वळु यावेळी भरपूर भडकलेला होता. त्याने या सयकिलिस्टचे जे हाल केले, ते तुम्ही व्हिडिओमध्ये (Shocking Video Viral) पाहू शकता.  (Aggressive Bull Attacked on a Cyclist)

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या २९ सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की रेसदरम्यान रॉक कोब्लर नावाच्या सायकिलिस्टवर संपातलेल्या वळुने अचानक हल्ला केला. या बैलाने इतका भयंकर हल्ला केला की पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वळु रॉक कोब्लरवर एकदा नाही तर दोन वेळा हल्ला करतो. रॉक पहिल्या हल्ल्यातून सावरण्याआधीच वळु त्यांना पुन्हा आपल्या शिंगांवर उचलून जमिनीवर आदळतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की भडकलेला वळु सायकल रेसच्या रस्त्यात उभा राहातो. हा वळु अतिशय रागात दिसतो. कारण त्याने याआधी आणखी दोन सायकिलिस्टवर हल्ला केलेला होता. रॉक कोब्लर त्याच्या जवळ येताच रेडा त्यांच्यावर अचानक हल्ला करतो. तो त्यांना हवेत फेकून जमिनीवर आदळतो.

Web Title: bull attacks cyclist and toss him in air video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.