Viral Video: बाबो! शांतपणे आपली ड्युटी करत होता पोलीस, मागुन बैल आला अन् उचलून जमीनीवर फेकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:44 PM2022-04-04T13:44:14+5:302022-04-04T13:51:51+5:30
कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे ड्युटीवर असताना शेरपूर चौकात उभे होते, तेव्हा मागून आलेल्या एका बैलाने त्यांना शिंगावर उचललं आणि आपटलं. यामुळं ते बेशुद्ध झाले.
देशाच्या राजधानीतील दयालपूर भागात गुरुवारी संध्याकाळी दिल्लीपोलिसांच्या एका हवालदारावर ड्युटी सुरू असताना एका बैलानं प्राणघातक हल्ला केला. कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे शेरपूर चौकात ड्युटी देत असताना ही घटना घडली. बैलानं या हवालदारावर मागून हल्ला केला आणि त्याला शिंगांच्या सहाय्यानं हवेत फेकलं आणि जमिनीवर आपटलं.
ज्ञानसिंग यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या पाठीच्या हाडाला खूप दुखापत झाली आहे. जमिनीवर पडल्यानंतर या पोलिसाला स्वतःहून उठता येत नव्हतं. ड्युटीवर असलेल्या इतर पोलिसांनी त्याला आधार देत हॉस्पिटलमध्ये नेलं.
कॉन्स्टेबल ज्ञानसिंग हे ड्युटीवर असताना शेरपूर चौकात उभे होते, तेव्हा मागून आलेल्या एका बैलाने त्यांना शिंगावर उचललं आणि आपटलं. यामुळं ते बेशुद्ध झाले. सुदैवानं ते जमिनीवर पडल्यानंतर बैल निघून गेला आणि त्यानं त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला नाही. झालेला प्रकार बघितल्यानंतर ड्युटीवर असलेल्या इतर पोलिसांना काहीच सुचेना. त्यांनी ज्ञानसिंग यांना घाईघाईनं उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ड्युटीवर असलेल्या ज्ञानसिंग यांना बैलानं कसं उचलून आपटलं हे दिसत आहे. ते मोबाईलवर एका वाटसरूचा फोटो काढत असताना ही घटना घडली. सुदैवानं बैलानं त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला नाही. या अचानक झालेल्या हल्ल्यानं ज्ञानसिंग काही क्षणांसाठी स्तब्ध झाले पण त्यांनी संयम राखला. रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दिल्ली पुलिस के एक कॉन्स्टेबल पर सांड ने जानलेवा हमला कर दिया। घटना उत्तर-पूर्वी दिल्ली के दयालपुर क्षेत्र की है। यहां ड्यूटी पर तैनात एक कॉन्स्टेबल को आवारा सांड ने अपने सीगों से उठाकर रोड पर पटक दिया। घटना #CCTV में कैद हो गई है। कॉन्स्टेबल का नाम ज्ञान सिंह है। #DelhiPolicepic.twitter.com/itAbx667pU
— Sumit Pandey | सुमित पांडेय (@journo_sumit) April 3, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिस कर्मचार्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि बैलाने पुन्हा हल्ला केला नाही, हे सुदैव असल्याचं लोक म्हणत आहेत.