बाबो! पाण्याच्या टाकीवर जाऊन उभा राहिला बैल; अन् लोक म्हणाले मौसी को बुलाओ रे.......
By manali.bagul | Published: December 30, 2020 01:57 PM2020-12-30T13:57:03+5:302020-12-30T14:03:57+5:30
Trending Viral in Marathi : वीरू जसा मावशीच्या सांगण्यावरून खाली उतरण्यास तयार होतो. त्याचप्रमाणे या बैलाला खाली उतरवण्यासाठी 'कोई मौसी को बुलाओ रे.......' असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पाण्याची लांबच लांब टाकी पाहिला की सगळ्यात आधी मनात प्रश्न येतो. या टाकीवर चढतात तरी कसं? कारण नागमोडी वळणाची ही टाकी पाहिल्यानंतर चढणारा तोल जाऊन पडल्यानंतर काय होईल याचा विचार सुद्धा केला जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर या पाण्याच्या टाकीचा फोटो व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या पाण्याच्या टाकीवर चक्क बैल जाऊन उभा राहिला आहे. हा बैल पाहिल्यानंतर एवढ्या उंचावर हा बैल पोहोचला तरी कसा, हा विचार लोकांच्या मनात येत आहे.
Effect of reading too many motivational tweets !! pic.twitter.com/rK9C2Q9kLX
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) December 30, 2020
या फोटोला लोकांनी खूप पसंती दिली आहे. आतापर्यंत या फोटोला २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि १६५ पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी या फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोकांनी या फोटोवर अनेक गमतीदार कमेंट्स केल्या आहेत.
खोदकाम करताना सापडलं २ हजार वर्ष जुनं कँटिन; अन् डब्बा उघडताच दिसलं असं काही, पाहा फोटो
दरम्यान २०१६ ला व्हायरल झालेला हा फोटो सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. हा फोटो राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील आहे. हा बैल ६० फूट उंच टाकीवर जाऊन उभा राहिला आहे. हा फोटो पाहून सगळ्यांनाच शोले चित्रपटातील धमेंद्रचा टाकीवर चढण्याचा सीन आठवला आहे.
चित्रपटातील वीरू जसा मावशीच्या सांगण्यावरून खाली उतरण्यास तयार होतो. त्याचप्रमाणे या बैलाला खाली उतरवण्यासाठी 'कोई मौसी को बुलाओ रे.......' असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबो! झाडाला लागलेले अडीच-तीन किलोचे लिंबू पाहून गावकऱ्यांची उडाली झोप; पाहा फोटो