VIDEO:५६ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर फिरवला बुलडोझर; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:18 PM2022-07-21T18:18:23+5:302022-07-21T18:43:36+5:30
गुजरात मधील सुरत जिल्ह्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटलांवर बुलडोझर फिरवला आहे.
गांधीनगर ।
गुजरातच्या सुरत जिल्ह्यात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत ५७ लाखांच्या अवैध दारूच्या बाटल्यांवर बुलडोझर फिरवला आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे. पोलिसांनी विविध भागातून अवैध दारूच्या बाटला जमा केल्या होत्या ज्यांना नष्ट करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असून देखील अनेकवेळा दारूची विक्री आणि दारू सापडल्याच्या घटना समोर येत असतात.
गुजरात पोलिसांनी विविध भागांतून जमा केलेली ५६ लाखांची अवैध दारू अखेर नष्ट करण्यात आली. यासाठी पोलिसांनी दारूच्या सर्व बॉटल्स रस्त्यावर पसरल्या आणि त्यावर बुलडोझर फिरवला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाखो रूपयांच्या दारूवर कसा बुलडोझर फिरवला जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही अनोखी कारवाई करताना पोलिसांचा तिथे मोठा बंदोबस्त होता.
#WATCH गुजरात: सूरत में जिला पुलिस ने 56 लाख रुपए की अवैध शराब को नष्ट किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 21, 2022
सूरत जोन-3 के DCP ने कहा, "ये शराब पुलिस ने अलग-अलग इनपुट के आधार पर जब्त किए हैं और उसी क्रम में इसे नष्ट किया गया है।"(20.07) pic.twitter.com/cHuXY3GtYg
पोलीस उपायुक्तांनी काय म्हटलं?
या घटनेची माहिती देताना सुरतमधील पोलिस उपायुक्त यांनी म्हटले, "ही अवैध दारू पोलिसांनी विविध भागातून जमा केली आहे आणि अगदी त्याच पद्धतीने नष्ट केली आहे. याच पद्धतीची कारवाई इथून पुढे देखील होत राहील आणि याच पद्धतीने दारू नष्ट केली जाईल." अस म्हणत उपायुक्तांनी दारू माफियांनी इशारा दिला आहे.
शौचालयाच्या खड्ड्यात लपवली होती दारू
काही आठवड्यांपूर्वी सुरत पोलिसांनी एका अशाच दारू माफियाचा शोध लावला होता, ज्याने आपल्या शौचालयाच्या खड्ड्याला दारूचे दुकान बनवून त्यामध्ये २.८५ लाखांची अवैध दारू लपवून ठेवली होती. दरम्यान पोलिसांनी आरोपी दारू माफिया काशीनाथला ताब्यात घेतले होते.