मला दहा रुपये द्या, तुमच्या नावाने पवित्र स्नान मी करतो... 'डुबकी बिजनेस मॅन' चा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:29 PM2024-01-18T12:29:28+5:302024-01-18T12:30:49+5:30

सध्या सोशल मीडियावर 'डुबकी बिजनेस मॅन'चा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

Business man ananad mahindra share a video of a man who was ready to dip on river to other people video goes viral on social media  | मला दहा रुपये द्या, तुमच्या नावाने पवित्र स्नान मी करतो... 'डुबकी बिजनेस मॅन' चा Video व्हायरल

मला दहा रुपये द्या, तुमच्या नावाने पवित्र स्नान मी करतो... 'डुबकी बिजनेस मॅन' चा Video व्हायरल

Viral Video : संपूर्ण देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्याने वातावरण एकदम कुल झाल्याचे पाहायला मिळते आहे. सर्वत्र देशभरात पारा कमालीचा घसरल्याने  अनेकांना हुडहुडी भरली आहे. परंतु बऱ्याच धार्मिक स्थळी तेथील पवित्र नदी वा कुंडात स्नान करण्याची प्रथा, परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. अशा हाडे गोठवणाऱ्या थंडीत गार पाण्याने  स्नान करायचे  म्हटले, तर  कित्येकांच्या अंगावर काटा येईल. 

मग अशा आव्हानात्मक परिस्थितीतही व्यवसाय शोधणाऱ्यांचे टॅंलेंट हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवर शेअर केला. 

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नदीतील कठड्यावर बसून लोकांना आवाहन करताना दिसतोय. तुम्हाला नदीत स्नान करायची इच्छा आहे. परंतु तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त दहा रुपयांची पावती फाडा , तुमच्या नावाने मी स्नान करतो. या पवित्र स्नानाचे पुण्य तुम्हाला मिळेल आणि पैसे  मला मिळतील अशा प्रकारे गंमतीशीर आवाहन व्हिडीओतील व्यक्ती करत आहे. 

पाहा व्हिडीओ :

हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Web Title: Business man ananad mahindra share a video of a man who was ready to dip on river to other people video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.