जे दिसतं ते तसं नसतं, पण जे दिसतं ते चक्रावून सोडतं... कसं ते पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:02 AM2019-09-30T11:02:36+5:302019-09-30T11:05:34+5:30
या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतयं? विचार करा आणि नीट ओळखून सांगा. कारण या फोटोमध्ये जे दिसतयं ते खरचं तसं नाहीये. मग काय आहे हा प्रश्न पडलाच असेल.
आपल्या कुटुंबातील थोरा मोठ्यांच्या तोंडून आपल्याला अनेक सल्ले मिळत असतात. त्यातील आपण काही ऐकतो तर काही ऐकत नाही. पण अनेकदा ते आपल्याला ते आवर्जुन सांगतात की, 'जग फार बदललंय, त्यामुळे कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. जे आपल्याला दिसतं तसचं असेल असं नाही. त्यामुळे फार सावध राहून वागा.' हाच सल्ला लागू होतोय या फोटोला.
या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतयं? विचार करा आणि नीट ओळखून सांगा. कारण या फोटोमध्ये जे दिसतयं ते खरचं तसं नाहीये. मग काय आहे हा प्रश्न पडलाच असेल. तो एक केक आहे.
सध्या रिअॅलिस्टिक केकचा ट्रेन्ड सुरू आहे. या आर्टिस्टने असेच काही रिअॅलिस्टिक केक तयार केले आहेत. पण ते ओळखणंही कठिण होतंय. कारण ते एवढे हुबेहुब आहेत की, त्यातील फरक ओळखणं जवळपास अशक्यच...
आतापर्यंत तुम्ही अनेक केक पाहिले असतील, पण आम्ही खात्रीने सांगतो की, असे रिअॅलिस्टिक केक तुम्ही कधीच पाहिले नसतील. सध्या सोशल मीडियावर या केकचे फोटो प्रचंड व्हायरल आहेत. खरं तर हे फोटो पाहताच क्षणी या खऱ्याखुऱ्या गोष्टी असल्याचा भास होतो. परंतु, त्यानंतरच्याच फोटोमध्ये तो केक असच्याचं समजताच आश्चर्याचा धक्का बसतो.
वाढदिवसाचं आकर्षण असतं ते त्या दिवशी कापण्यात येणाऱ्या केकमुळे. सध्या बाजारात विविध प्रकारचे, फ्लेवर्सचे केक उपलब्ध आहेत. एवढचं नाहीतर फोटो केक आणि 3D केकची चर्चा सगळीकडे होताना दिसून येते.
पण सध्या एका आर्टिस्टने तयार केलेल्या रिअॅलिस्टिक केकची चर्चा सगळीकडे होताना दिसून येते. कारण त्यांनी तयार केलेले केक पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही की, हे केक आहेत.
हे केक कापण्याची इच्छा खरचं कुणाचीही होणार नाही. कारण हे केक दिसायलाच एवढे सुंदर दिसतात की, त्यांच्याकडे पाहातच रहावं असं वाटतं...
केकला हुबेहुब रिअॅलिस्टिक करणाऱ्या आर्टिस्टचं नाव आहे, Luke Vincentini. अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणारा या अवलियाचे इन्स्टाग्रामवर 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.