'या' फोटोमधील बदकांची संख्या आहे तरी किती? व्हायरल होतोय बदकांचा फोटो, बघा तुम्हाला जमतंय का...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:42 PM2021-01-29T15:42:49+5:302021-01-29T15:57:32+5:30
हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, खूप सोपा प्रश्न आहे. या फोटोतील बदकांची संख्या किती?
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर एक आवाहानात्मक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून सगळेच सगळेचजण गोंधळात पडले आहेत. हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, खूप सोपा प्रश्न आहे. या फोटोतील बदकांची संख्या किती? हा फोटो शेअर केल्यानंतर लोकांनी वेगवेगळी उत्तरं द्यायला सुरूवात केली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी हा उत्तम प्रश्न आहे.
A very simple question- how many 🦆 s? pic.twitter.com/12xV2An9sf
— Harsh Goenka (@hvgoenka) January 27, 2021
आपण स्वतः फोटो पाहून या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. तुम्हीसुद्धा बदकांची संख्या सांगण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळात पडाल , हा फोटो काळजीपूर्वक पाहा. पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपल्याला फोटोमध्ये 9 बदकं दिसतील. परंतु, जसे आपण फोटोकडे बारकाईनं लक्ष द्याल तसं बदकांची संख्या वाढेल. काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं
17 hai pic.twitter.com/lIb01qSbJc
— P P (@PRIYADARSHIPREM) January 27, 2021
त्यानंतर तुम्हाला फोटोतील बदकांची संख्या समजण्यास मदत होईल. एकामध्ये दोन ते तीन बदक लपलेले तुम्हाला दिसून येतील.
A-1+2+2
— RUCHI MISHRA (@minkimishra) January 27, 2021
B-2+2+2
C-3+2+1
Total =17
आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. या फोटोत एकूण १६ बदक असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ