Optical Illusion: फोटोत किती आहेत प्राणी, शोधून शोधून थकले लोक; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 09:38 AM2023-07-01T09:38:20+5:302023-07-01T09:42:52+5:30
Optical Illusion : या फोटोत तुम्ही बघू शकता की, ज्यात दिसत आहे की, एक अस्वल उभा आहे. पण त्याच्या मागे किती प्राणी आहे हे शोधणं फार अवघड काम आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो डोकं चक्रावून सोडत आहे.
Number Of Animals: ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची आजकाल सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ बघायला मिळते. लोकांनी यातील रहस्य शोधणं फार आवडतं. कारण यातून मनोरंजनासोबतच मेंदुचीही कसरत होते. सोबतच डोळ्यांची टेस्टही होते. हे फोटो मेंदु आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अशात लोकांसमोर आव्हान उभं राहतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात किती प्राणी आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे.
या फोटोत तुम्ही बघू शकता की, ज्यात दिसत आहे की, एक अस्वल उभा आहे. पण त्याच्या मागे किती प्राणी आहे हे शोधणं फार अवघड काम आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो डोकं चक्रावून सोडत आहे. महत्वाची बाब म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन वैज्ञानिकांना हे समजून घेण्यास मदत करतात की, एखाद्या फोटोबाबत बोलताना आपला मेंदू कशाप्रकारे काम करतो.
फोटोची मजेदार बाब ही आहे की, ब्लॅक अॅन्ड व्हाईट असलेल्या या फोटोतील सगळे प्राणी एकदम दिसत नाहीयेत. फोटोत दिसत आहे की, अस्वलाच्या मागे बरेच छोटे प्राणीही बनवले आहेत. पण ते किती आहेत याचा अंदाज लावणं लोकांना अवघड जात आहे. पण ज्यांनी ते दिसले असतील ते खरंच जीनिअस असतील.
काय आहे उत्तर?
या फोटोत एकूण सहा प्राणी आहेत. यात अस्वल, श्वान, मांजर, वटवाघुळ, माकड आणि खारूताई आहे. अस्वल सगळ्यात समोर आहे तर अस्वलाच्या शेपटीवर खारूताई आहे. हा फोटो असा डिझाइन करण्यात आला की, सगळे प्राणी सहज दिसू नये.