चॅलेंज! 'या' फोटोत लपलं आहे एका मुलीचं नाव, अनेकांना शोधता आलं नाही तुम्हाला जमेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:10 PM2022-03-03T12:10:15+5:302022-03-03T12:12:20+5:30

Hidden Name in Viral Photo: अनेकांना वाटत असतं की, ते म्हणींमध्ये लपलेला अर्थ सहजपणे सांगू शकतात. पण कधी कधी सोप्या म्हणींचा अर्थही आपण सांगू शकत नाही.

Can you find hidden name of a girl in the picture | चॅलेंज! 'या' फोटोत लपलं आहे एका मुलीचं नाव, अनेकांना शोधता आलं नाही तुम्हाला जमेल का?

चॅलेंज! 'या' फोटोत लपलं आहे एका मुलीचं नाव, अनेकांना शोधता आलं नाही तुम्हाला जमेल का?

Next

Hidden Name in Picture: सगळ्यांनाच वाटत असतं की ते हुशार आहेत. पण अनेकदा लोकांच्या या हुशारीवर सर्वांसमोर प्रश्न उपस्थित होता. अनेकदा लोक आपल्याला असे काही प्रश्न विचारतात की, त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. पण उत्तर सोपच असतं. बालपणापासून आपण वाक्यप्रचार ऐकत असतो. अनेकांना वाटत असतं की, ते म्हणींमध्ये लपलेला अर्थ सहजपणे सांगू शकतात. पण कधी कधी सोप्या म्हणींचा अर्थही आपण सांगू शकत नाही.

असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता अनेकांची झोप उडाली. यात एक फोटो आहे ज्यात एका मुलीचं नाव लपलेलं आहे. हा फोटो चांगला व्हायरल झाला असून लोक यातील लपलेलं नाव शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलीचं हे नाव फारच कॉमन आहे. जरा लक्ष देऊन पाहिलं तर तुम्ही सहजपणे ओळखू शकाल.

तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता तर लगेच फोटो बघा आणि त्यात मुलीचं कोणतं नाव लपलं आहे ते सांगा. तुम्ही बघू शकता की, फोटोत एक १०० रूपयांची नोट आहे. त्यासोबत त्या नोटेच्या बाजूला एक नळाची तोटीही आहे. या दोन्ही गोष्टी मिळून एक नाव तयार होतं. पण त्यासाठी तुम्हाला हिंदी शब्द आठवावे लागतील.

यात मुलीचं नाव जे दडलं आहे ते फारच सोपं आहे. शंभर रूपयांच्या नोटेला हिंदीत सौ रूपये असं म्हणतात. यातील सो आणि बाजूला असलेल्या नळाच्या तोटीला हिंदीत नल म्हणतात. हे दोन्ही अक्षरं मिळून सो+नल म्हणजे सोनल हे नाव तयार होतं. जे या फोटोत लपलं आहे.
 

Web Title: Can you find hidden name of a girl in the picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.