'या' फोटोमधील पोपटांची आणि सापांची संख्या शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का हे चॅलेन्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:30 IST2020-06-18T17:25:43+5:302020-06-18T17:30:46+5:30

. या फोटोमध्ये सापांची संख्या शोधून दाखवणं हे खूपच आवाहानात्मक आहे.

Can you find a snake in the jungle peoples find very difficult see viral photo | 'या' फोटोमधील पोपटांची आणि सापांची संख्या शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का हे चॅलेन्ज

'या' फोटोमधील पोपटांची आणि सापांची संख्या शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का हे चॅलेन्ज

घरात किंवा घराभोवती आलेला साप शोधायचं किंवा साप पकडायचा विचार करूनच लोकांना घाम फुटतो. पण एखाद्या फोटोमध्ये साप शोधायला लोकांना खूप मज्जा येते. कारण नजरेला ताण देऊन एखादा टास्क असल्याप्रमाणे आपण शोधत असतो. सध्या सोशल मीडियावर एक फोटो  तुफान व्हायरल होत आहे.  हा फोटो बुधवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या फोटोत लोकांना साप शोधण्याचं आवाहन केलं होतं.

तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता जंगलात खूप झाडं आहेत.  झाडांसह वेली सुद्धा आहेत यासह अनेक प्रकारचे पक्षी आणि साप या फोटोमध्ये तुम्हाला दिसून येतील. या फोटोमध्ये सापांची संख्या शोधून दाखवणं हे खूपच आवाहानात्मक आहे.

 या जंगलात तुम्हाल किती साप दिसत आहेत शोधून दाखवा असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. हा फोटो १७ जुनला सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोला आत्तापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी या फोटोला युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

बम बम भोले! नदी किनारी वाळूमध्ये सुरू होतो खोदकाम, शेकडो वर्ष जुनं शिव मंदिर सापडलं...

नोकरी गेली, म्हणून आजोबांनी सुरू केलं यु-ट्यूब चॅनेल; अन् महिन्याभरात केली कमाल....
 

Web Title: Can you find a snake in the jungle peoples find very difficult see viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.