Optical Illusion: फोटोतील 5 लोकांपैकी एकाने केली महिलेची हत्या, शोधा कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:26 AM2023-07-05T11:26:17+5:302023-07-05T11:29:50+5:30
Optical Illusion : मोजक्याच लोकांनी आपल्या मेंदूच्या जोरावर यातील रहस्याचा उलगडा केला.
Optical Illusion : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. यातील काही ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व करता करता अनेकांच्या नाकी नऊ येतात. पण योग्य उत्तर मिळू शकत नाही. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना खूप आवडत आहे. यातील रहस्य उलगडण्यासाठी लोक तासंतास वेळ लावत आहेत. पण मोजक्याच लोकांनी आपल्या मेंदूच्या जोरावर यातील रहस्याचा उलगडा केला.
या फोटोत तुम्हाला एक रेस्टॉरन्ट दिसत आहे. ज्याच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे. तुम्हाला या महिलेच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा आहे. पण मारेकरी शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे. या फोटोकडे बारकाईने बघा तेव्हाच तुम्हाला या खूनाचा छडा लावता येणार आहे.
कोण आहे महिलेचा मारेकरी?
जर बराच वेळ घालवूनही तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. या फोटोत पाच संशयीत आहेत. या पाच संशयीतांपैकी एकाच्या चेहऱ्यावर 12 वाजले आहेत. त्याशिवाय मृत महिलेच्या हातात शर्टचा फाटलेला कपडाही दिसत आहे. जर या हिंट देऊनही तुम्हाला खूनी सापडला नसेल तर खाली उत्तर दिलं आहे.
यातील व्यक्ती नंबर 4 हा महिलेचा मारेकरी आहे. कारण त्याच्या मानेवर निशाण आहे. तसेच तोच रेस्टरूमच्या जास्त जवळ आहे. त्याच्याकडे चाकूही नाही आणि महिलेच्या हातात त्याच्या शर्टचा फाटलेला कपडा आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यातील रहस्य उलगडणाऱ्या व्यक्तींमध्ये फारच कमी लोकांचा समावेश आहे.