तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल या दोन फोटोमधील फरक, 10 सेकंदाचा आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 10:04 AM2023-06-07T10:04:42+5:302023-06-07T10:06:46+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमध्ये फरक शोधायचा आहे.
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यात ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या फोटोंची क्रेझ भरपूर बघायला मिळते. अनेक क्वीज गेम्स लहानांसोबत मोठेही खेळतात. काहींमध्ये प्राणी शोधायचे असतात तर काहींमध्ये फरक शोधायचा असतो. याने तुमची आयक्यू टेस्टही होते आणि डोळ्यांची दृष्टी कशी आहे हेही समजतं. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमध्ये फरक शोधायचा आहे.
तुमच्या समोर दोन फोटो आहेत. पहिल्या नजरेत तर हे फोटो एकसारखे दिसतात. पण ते एकसारखे नाहीत. त्यात काही फरक आहेत. जे तुम्हाला 10 सेकंदाच्या वेळात शोधायचे आहेत. या फोटोत तुम्हाला पिझ्झा डिलिव्हरी करणारा एक व्यक्ती स्कूटरवर बसलेला दिसतोय. त्याच्या हातात पिझ्झाचा डब्बा आहे. तसेच या व्यक्तीच्या मागे काही इमारती दिसत आहेत. या फोटोत तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत.
जर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला लगेच यातील फरक दिसून येतील. डोकं शांत ठेवून बारकाईने बघाल तर तुम्हाला यात यश मिळेल. पण तरीही जर तुम्हाला यातील फरक दिसत नसतील तर आम्ही यात तुमची मदत करू.
यातील पहिला फरक तुम्हाला या व्यक्तीच्या स्कूटरच्या समोरच्या चाकामध्ये दिसेल. तर दुसरा फरक पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीच्या हेअरस्टाईलमध्ये दिसेल. तिसरी फरक त्याच्या कॉलरमध्ये तर चौथा फरक इमारतीच्या खिडक्यांमध्ये दिसेल. शेवटी पाचवा फरक बिल्डींगवरील एंटीनामध्ये दिसेल.