आरं कुठंय बिबट्या? लोकांचे शोधून शोधून डोळे दुखले पण सापडेना...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 01:15 PM2021-09-08T13:15:37+5:302021-09-08T13:18:27+5:30
Where is the leopard? भारतीय वन सेवा अधिकारी @VaibhavSinghIFS यांनी हा फोटो 7 सप्टेंबरला पोस्ट केला आहे.
बिबट्या (Leopard) घात लावून शिकार करतो. तो जंगलातील झाडी, झुडपांमध्ये अशाप्रकारे बेपत्ता होतो की तीक्ष्ण नजरेचे पशू पक्षीही त्याला पाहू शकत नाहीत. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिबट्या लपलाय परंतू लोकांना फक्त घर, दगड, झाडे असेच काही बाही दिसत आहे. चला एकदा तुम्हीही प्रयत्न करून पहा. (Living close to forests provides us with ample of opportunities to witness the magnificent wildlife around, provided one has the eye to notice it.)
भारतीय वन सेवा अधिकारी @VaibhavSinghIFS यांनी हा फोटो 7 सप्टेंबरला पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी हा फोटो काही काळापूर्वी रुद्रप्रयागच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजुला काढला होता. पाहूया तुमच्यापैकी किती लोक या फोटोतून बिबट्याला शोधू शकता?
चला तर मग लागा कामाला, पाहुया तुमच्या डोळ्यांची पावर...
Living close to forests provides us with ample of opportunities to witness the magnificent wildlife around, provided one has the eye to notice it ! Clicked this a few days back behind my office in #Rudraprayag !Lets see how many of you can spot the #Leopard in this? pic.twitter.com/JLEMQlFFsV
— Vaibhav Singh,IFS (@VaibhavSinghIFS) September 7, 2021