ढूंढते रह जाओगे! या फोटोतील बिबट्या शोधून शोधून थकले लोक, बघा तुम्हाला जमतंय का!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:29 PM2021-07-14T14:29:58+5:302021-07-14T14:58:00+5:30
बिबट्याचा आणि डोंगरांचा रंग एकसारखा दिसतो. त्यामुळे त्याला डोंगरात सहजासहजी शोधणं अवघड होऊन जातं.
स्नो लेपर्ड हा बिबट्याचाच भाऊ आहे ज्याला मराठीत 'हिमबिबट्या' म्हणतात. हा बिबट्या हिमालयाच्या कडाक्याच्या थंड डोंगरांमध्ये राहतो. मात्र, शिकार करण्यात जंगलातील बिबट्यासारखाच खतरनाक आहे. उंच डोंगरांवर तो शिकार करण्यासाठी असा धावतो की, ग्रॅविटीही त्याच्यासमोर कमजोर दिसू लागते. सोबतच त्याचा आणि डोंगरांचा रंग एकसारखा दिसतो. त्यामुळे त्याला डोंगरात सहजासहजी शोधणं अवघड होऊन जातं. या फोटोतही एक बिबट्या आहे. पण लोक त्याला शोधून शोधून थकले आहेत.
Who's here??? Try finding
— Sudha Ramen 🇮🇳 (@SudhaRamenIFS) July 13, 2021
PC @ryancragunpic.twitter.com/r342uw6GVs
हा फोटो आयएफएस अधिकारी सुधा रमन यांनी शेअर केला आहे. त्यांना या फोटोसोबत एक कॅप्शनही लिहिलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलं की, 'इथे कोम आहे? शोधण्याचा प्रयत्न करा'. हा फोटो Ryan Cragun यांनी काढलेला आहे. (हे पण बघा : जंगलात फिरताना दिसले वाघ, IAS ने फोटो शेअर करत विचारलं - सांगा फोटोत किती वाघ आहेत?)
या फोटोला आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत आणि ४० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. तुम्हाला या फोटोत काही दिसलं की नाही? अजून दिसलं नसेल तर आणखी एकदा प्रयत्न करा. जेणेकरून तुमची नजर किती बारीक आहे हे तुम्हाला कळेल.