'व्हॅलेंटाइन डे'च्या आधी व्हायरल झालं हे धमाल कोडं; शोधून दाखवा हृदयाच्या आकाराचा फुगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:34 PM2022-02-09T13:34:54+5:302022-02-09T13:36:05+5:30

'व्हॅलेंटाइन वीक'ला (Valentine's Week 2022) सुरुवात झाली आहे. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन वीकची क्रेझ पाहायला मिळते. यात आज 'चॉकलेट डे' साजरा केला जात आहे.

Can you Spot the love heart balloon in Valentines Day viral Puzzle | 'व्हॅलेंटाइन डे'च्या आधी व्हायरल झालं हे धमाल कोडं; शोधून दाखवा हृदयाच्या आकाराचा फुगा!

'व्हॅलेंटाइन डे'च्या आधी व्हायरल झालं हे धमाल कोडं; शोधून दाखवा हृदयाच्या आकाराचा फुगा!

googlenewsNext

'व्हॅलेंटाइन वीक'ला (Valentine's Week 2022) सुरुवात झाली आहे. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाइन वीकची क्रेझ पाहायला मिळते. यात आज 'चॉकलेट डे' साजरा केला जात आहे. पण 'व्हॅलेंटाइन डे' येण्याआधीच सोशल मीडियात सध्या धमाल कोडं व्हायरल झालं आहे. जे सोडवण्यासाठी प्रेमी युगुलांसोबतच प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. कोडं सोडवता सोडवता अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियात येऊ लागल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अनेक गुलाब, हार्ट, धनुष्यबाण दिसत आहेत. या सर्वांमध्ये कुठंतरी हृदयाच्या आकाराचं फुग्याचं (Heart Balloon Puzzle) चित्र दडलं आहे. ते शोधून दाखवण्याचं आव्हान या कोड्यातून देण्यात आलं आहे. हे कोडं सोशल मीडियात व्हायरल होताच अनेकांनी आपल्या पारखी नजरेतून संपूर्ण फोटो न्याहाळून पाहण्यास सुरुवात केली आहे. पण कुणालाही 'हार्टशेप्ड'मध्ये असलेला फुगा काही या चित्रातून दिसून आलेला नाही. 

व्हॅलेंटाइन वीकचं सेलिब्रेशन करण्यासाठी एका ब्रिटीश रिटेलर २४७ ब्लाइंड्स कंपनीनं आपल्या वेबसाइटवर एक ट्रिकी ब्रेन टिझर नावानं अनोखी स्पर्धा भरवली आहे. यातीलच हे कोडं असून सध्या सोशल मीडियात याची जोरदार चर्चा आहे. यात 'हार्टशेप्ड बलून' शोधून दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं आहे. गुलाबी रंगाच्या बॅकग्राऊंडवर लाल रंगाचे गुलाब, धनुष्यबाण आणि इतर काही चिन्हं या चित्रात दिसून येत आहेत. यातच एक हृदयाच्या आकाराचा फुगा दडलेला आहे आणि तोच शोधून दाखवायचा आहे. 

हे आहे 'व्हेलेंटाइन डे' कोडं 

 

Web Title: Can you Spot the love heart balloon in Valentines Day viral Puzzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.