या फोटोतलं घुबड ३० सेकंदांच्या आत शोधलात तर तुम्ही खरे जिनियस! ९९ टक्के झाले फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:22 PM2022-06-15T18:22:53+5:302022-06-15T18:28:05+5:30

एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. या फोटोत एक घुबड (Owl) लपलंय आणि ते तुम्हाला 30 सेकंदात शोधायचं आहे. अनेक नेटकरी या फोटोत घुबड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Can you spot the owl hiding in this image in less than 30 seconds? | या फोटोतलं घुबड ३० सेकंदांच्या आत शोधलात तर तुम्ही खरे जिनियस! ९९ टक्के झाले फेल

या फोटोतलं घुबड ३० सेकंदांच्या आत शोधलात तर तुम्ही खरे जिनियस! ९९ टक्के झाले फेल

Next

आपण सगळे सोशल मीडिया (Social Media) वापरतो आणि दिवसातील बराचसा वेळ विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. काही काम नसेल किंवा बोअर होत असेल तर आपण हातात फोन घेतो आणि सोशल मीडियावर सर्फिंग करत बसतो. अलीकडे सोशल मीडिया हा वेळ घालवण्यासाठी मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी उपलब्ध असतात. माहिती देणाऱ्यांपासून ते अगदी मनोरंजन करणारे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध असतात.

विविध प्रकारच्या गंमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज् (Tricky Viral Photo), रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न, गेम (Games), क्विझ आणि पझल्सही व्हायरल होतात. बरेच नेटिझन्स ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोंची खूप चर्चा असते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला एक प्राणी शोधायचा आहे. या फोटोत एक घुबड (Owl) लपलंय आणि ते तुम्हाला 30 सेकंदात शोधायचं आहे. अनेक नेटकरी या फोटोत घुबड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

या फोटोत एका झाडाचं खोड दिसतंय. त्या खोडाला फांद्या आहेत. त्या फांद्यांना पालवी फुटल्याचंही दिसतंय. याच खोडामध्ये लपलंय ते एक घुबड. या खोडावर लपलेलं घुबड तुम्हाला नीट बघून शोधायचंय. ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोने नेटकऱ्यांना गोंधळात टाकलंय. नीट पाहिलं तर घुबड दिसतंय पुन्हा पाहिलं की तिथे फक्त झाडाचं खोड दिसतंय, त्यामुळे तिथे नक्की घुबड आहे की नाही, असा प्रश्नही अनेकांना पडलाय. या संदर्भात जागरण जोशने वृत्त दिलंय.

Web Title: Can you spot the owl hiding in this image in less than 30 seconds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.