तुम्ही गणितात मास्टर असाल तर द्या प्रश्नाचं उत्तर, व्हिडीओ बघून डोकं खाजवू लागले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 04:24 PM2022-02-24T16:24:27+5:302022-02-24T16:45:42+5:30

Puzzle Question : एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक वेगळ्याच पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला आहे. असे प्रश्न लोक ट्रिकच्या माध्यमातून सोडवतात.

Can you tell the correct answer asks in the video 99 percent people failed | तुम्ही गणितात मास्टर असाल तर द्या प्रश्नाचं उत्तर, व्हिडीओ बघून डोकं खाजवू लागले लोक!

तुम्ही गणितात मास्टर असाल तर द्या प्रश्नाचं उत्तर, व्हिडीओ बघून डोकं खाजवू लागले लोक!

Next

Puzzle Question: काही लोक बालपणापासूनच गणितापासून दूर पळतात आणि गणिताचे प्रश्न समोर आले तर आकडे त्यांच्या डोळ्यांसमोर फिरू लागतात. सोशल मीडियावर तर गणिताच्या प्रश्नांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात, ज्याची उत्तर द्यायला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाता. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक वेगळ्याच पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला आहे. असे प्रश्न लोक ट्रिकच्या माध्यमातून सोडवतात. ज्यांना ही ट्रिक समजते ते लोक नियमानुसार, प्रश्नाचं उत्तर सहजपणे देतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एक ट्रिकी प्रश्न विचारण्यात आला आहे. ज्यात 1+5 चं उत्तर 12 लिहिलं आहे. पण 1+5 चं उत्तर 6 होतं. पण हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. त्यामुळे उत्तर 12 दिलं आहे. व्हिडीओत पुढे 2+10 चं उत्तर 24, मग 3+15 चं उत्तर 36 लिहिलं आहे. शेवटचा प्रश्न आहे की, 6+30 चं उत्तर काय असेल?

हा व्हिडीओ शेअर केल्यावर लोक या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपापल्या ट्रिक वापरत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये काही लोकांनी उत्तर दिलं. त्यातील दोन कॉमन उत्तर आहेत एक म्हणजे 72 आणि दुसरं म्हणजे 48. कारण 12,24,36 हे नंबर्स पाहिले तर 12 च्या पाढ्यानुसार, पुढील उत्तर हे 48 असायला हवं. तेच जर  1+5 चं उत्तर 12 आलं आहे तर या ट्रिकनुसार, 5 आणि 1 ला दुप्पट करून जोडलं आहे. या ट्रिकनुसार, 6+30 चं उत्तर 72 यायला हवं. चला बघुया तुमचं काय येतं उत्तर?
 

Web Title: Can you tell the correct answer asks in the video 99 percent people failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.