लाइव्ह न्यूज बुलेटिनमध्ये महिला अ‍ॅंकरने गिळली माशी, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 12:10 PM2022-09-03T12:10:47+5:302022-09-03T12:16:49+5:30

Viral Video : सध्या असाच एक वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ काही फनी डान्स नाही, पण तरीही हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसाल. 

Canada women news anchor swallowed a fly during anchoring video viral | लाइव्ह न्यूज बुलेटिनमध्ये महिला अ‍ॅंकरने गिळली माशी, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

लाइव्ह न्यूज बुलेटिनमध्ये महिला अ‍ॅंकरने गिळली माशी, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

googlenewsNext

Latest Trending Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेदार असतात, तर काही व्हिडीओ हैराण करणारे असतात. पाकिस्तानातील काही पत्रकांरांचे व्हिडीओ तर पोटधरून हसायला लावणारे असतात. सध्या असाच एक वेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ काही फनी डान्स नाही, पण तरीही हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसाल. 

हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका न्यूज चॅनलचा आहे. यात एक अ‍ॅंकर न्यूज वाचत आहे आणि यादरम्यान उडत आलेली एक माशी तिच्या तोंडात जाते. न्यूजमध्ये खोळंबा होऊ नये म्हणून अ‍ॅंकर ती माशी गिळते आणि आपलं काम पुढे सुरू ठेवते. या घटनेचा व्हिडीओ स्वत: महिला अ‍ॅंकरने शेअर केला आहे. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला अ‍ॅंकर पाकिस्तानातील पूराची बातमी वाचत आहे. यादरम्यान एक माशी उडत येते आणि थेट तिच्या तोंडात जाते. ही माशी ती गिळते. माशी तोंडात गेल्यावर काही सेकंद ती थांबते आणि बातमी वाचणं पुढे सुरूच ठेवते. 

या महिला अ‍ॅंकरचं नाव फराह नसीर आहे. जी कॅनडातील ग्लोबल न्यूज चॅनलमध्ये अ‍ॅंकर आहे. तिने या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, व्हिडीओ शेअर करत आहे. कारण लोकांनी हसावं. हसणं फार गरजेचं आहे. अ‍ॅंकरिंग करताना माशी गिळली आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला. आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर सोळाशेपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.

Web Title: Canada women news anchor swallowed a fly during anchoring video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.