'लग जा गले'... पाच वर्षानी भेटला प्रियकर, एअरपोर्टवर प्रेयसीने दिलं अनोखं 'सरप्राईज' (Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 01:28 PM2023-11-10T13:28:49+5:302023-11-10T14:50:01+5:30
सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक तरुणी विमानतळावर डान्स करताना दिसत आहे.
Viral Video:सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक तरुणी विमानतळावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ लक्षवेधी ठरण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये दिसणारी मुलगी ही तब्बल पाच वर्षांनी तिच्या प्रियकराला भेटत असल्याने त्या तरुणीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आपल्या प्रियजनांवर प्रेम असणं स्वाभाविक आहे, परंतु ही भावना अतिशय उत्कटतेने व्यक्त करणे ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे या तरुणीवर सोशल मिडियात सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या प्रियकराला या तरुणीने पाच वर्षानंतर भेटल्यावर अनोख्या पद्धतीनं सरप्राईज दिलं आहे. त्यानंतर या व्हिडीओमध्ये तरुणीचा प्रियकर लाजल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
सर्वात आधी हा व्हिडीओ इंस्टाग्राम हॅंडलवर -nikishah पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये एका तरुणीने कॅनडा एअरपोर्टवर आपल्या प्रियकराला दिलेलं सरप्राईज पाहून सर्वजण पाहतच राहिले. त्याच दरम्यान या तरुणीचा बॉयफ्रेंड एअरपोर्ट गेटच्या बाहेर पडत असताना काही लोक त्याला फुलं देऊन त्याचं स्वागत करतात. त्यानंतर एअरपोर्टवर डान्स करून ज्या पद्धतीने ती तरुणी आपल्या प्रेमाची कबुली देते, ते पाहून तो युवक भावूक झाल्याचे दिसते आणि तो त्या तरुणीला मिठी मारतो.
डान्स केल्यानंतर हे कपल एकमेकांना मिठी मारतात. एअरपोर्टवर असलेल्या प्रवाशांना ही बाब काहीशी अजब वाटली त्यामुळेच त्यांनी ही गोष्ट शूट केली. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून प्रचंड पसंती मिळाली आहे. काही दिवसांतच या व्हिडीओला तब्बल 3.3 मिलियन व्यूज मिळाले असून या व्हिडीओची वाहवा केली जात आहे.