माणसाच्या नाही तर झाडाच्या प्रेमात पडलेय ही महिला; त्याला पाहून म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 02:20 PM2023-12-30T14:20:19+5:302023-12-30T14:21:12+5:30

सोशल मीडियावर कॅनडातील एका महिलेची चांगलीच चर्चा रंगलीय. 

Canda 45 years women fall in love with oak tree unique love story post has been viral on social media | माणसाच्या नाही तर झाडाच्या प्रेमात पडलेय ही महिला; त्याला पाहून म्हणते...

माणसाच्या नाही तर झाडाच्या प्रेमात पडलेय ही महिला; त्याला पाहून म्हणते...

Social Viral : हल्ली सोशल मीडियावर आपले व्हिडीओज शेअर करण्यात प्रेमी युगुलं कुठंही कमी पडताना दिसत नाहीत. निरनिराळ्या प्रकारच्या  गाण्यांवर ठेका धरत नाचकाम करण्यात ते दंग असल्याचे पाहायला मिळते. हे कमी की काय त्यात आता कॅनडातील एका महिलेने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. 

या महिलेने केलेली पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. कॅनडामध्ये राहणारी ही महिला सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचं कारण आहे तिने केलेली लक्षवेधी पोस्ट. व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये या महिलेने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्या पोस्टमध्ये या महिलेचा जीव एका झाडामध्ये गुंतल्याचं तिने स्पष्ट केलंय. माणसावर नाही, कोणा प्राण्यावर नाही तर या महिलेचा चक्क झाडावर जीव जडलाय. ही अनोखी प्रेम कहाणी फार गंमतीशीर वाटणारी आहे. 

प्रेम आंधळ असतं हे आपण बऱ्याचदा ऐकलंय, पण प्रेम इकोसेक्सुअल देखील असतं हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असणार. व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील महिला एका ओक ट्रीवर प्रेम झालं. ओकच्या झाडावर ही महिला फिदा झाले.

माहितीनूसार, ही महिला निसर्ग प्रेमी आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहून आपाल वेळ घालवणं हा या महिलेचा छंद आहे. सोन्या असं या वृक्षप्रेमी महिलेचं नाव आहे. हिरव्या निसर्गाच्या सानिध्यात राहून या झाडांप्रती असलेलं माझं प्रेम वाढलं असं ही महिला तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतेय. वारंवार झाडांच्या सहवासात राहून माझा जीव त्यांच्यात अडकला असं सोन्या नेटकऱ्यांना सांगतेय. 

येथे पाहा - 

Web Title: Canda 45 years women fall in love with oak tree unique love story post has been viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.