इथे इमारतींच्या छतावरून वेगाने धावतात गाड्या, लोकांची अजब जीवनशैली पाहून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:21 IST2024-12-16T15:21:09+5:302024-12-16T15:21:55+5:30

काही रहिवाशी इमारतींच्या छतांवर मोठमोठ्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यावरून गाड्या वेगाने धावत आहेत.

Cars run on the building's roof people surprised seeing video | इथे इमारतींच्या छतावरून वेगाने धावतात गाड्या, लोकांची अजब जीवनशैली पाहून व्हाल अवाक्!

इथे इमारतींच्या छतावरून वेगाने धावतात गाड्या, लोकांची अजब जीवनशैली पाहून व्हाल अवाक्!

China Viral Video: इंजिनिअरींगचं विश्व अनेक आपल्याला अशा गोष्टी दाखवतं ज्यावर सहजासहजी विश्वास बसत नाही. या गोष्टी कशा शक्य असू शकतात? असा प्रश्न मनात येतो. असाच एक इंजिनिअरींगचा कारनामा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बिल्डींगच्या छतावरून हायवे बांधण्यात आला आहे. ज्यावरून गाड्या वेगाने धावत आहेत. हा व्हिडीओ बघून लोक अवाक् झाले आहेत आणि या आयडियाचं कौतुकही केलं आहे.

व्हिडिओत बघू शकता की, काही रहिवाशी इमारतीच्या छतांवर मोठमोठ्या रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यावरून गाड्या वेगाने धावत आहेत. ही इमारत हायराइज अपार्टमेंट्सची आहे. त्यावर ओव्हरब्रीजसारखे रस्ते बनले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या इमारतींमध्ये शेकडो परिवार राहतात. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचं सांगण्यात येत आहे.


व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर इट्स चायना बेबी नावाच्या एका अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ११ लाखांपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत. तर बऱ्याच लोकांनी व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एकाने विचारलं की, जर छतावरून गाड्या धावतात तर लोक कपडे कुठे वाळवतात. तर काही म्हणाले की, हे केवळ चीनमध्येच बघायला मिळू शकतं.
 

Web Title: Cars run on the building's roof people surprised seeing video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.