Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:02 PM2020-08-30T16:02:01+5:302020-08-30T16:05:59+5:30

गेल्या काही दिवसात तुम्ही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.  लॉकडाऊन दरम्यान माणसं आपापल्या घरात बंद असल्यानं प्राण्यांचा ...

Cat drinking water from cooler in viral video | Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

Next

गेल्या काही दिवसात तुम्ही प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.  लॉकडाऊन दरम्यान माणसं आपापल्या घरात बंद असल्यानं प्राण्यांचा मोकळ्या रस्त्यावरील प्राण्यांचा वावर वाढला आणि वेगवेगळी दुर्मीळ, अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळाली.   लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कोरोनापासून बचावासाठी आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. सध्या सोशल मीडियावर एक मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही मनीमाऊ पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल. या व्हिडीओतील  मनीमाऊची कृती पाहून तुम्हीही तिला आत्मनिर्भर म्हणाल. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मांजर दोन पायावर उभी राहून स्वतः पाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे.  अॅक्वा कुलरचा नळ सुरू करून पाणी पिते आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर पुन्हा नळ बंद करते.  त्यानंतर मिशांना लागलेलं पाणी स्वच्छ करून निघून जाते. या मांजरीचा व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दिली आहे. 

आतापर्यंत या व्हिडीओला २८ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. तर दीड लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाईक आणि शेअर केला आहे. अनेक युझर्सनी या मांजरीला पाहून आपल्या घरातील मांजरींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

सोशल मीडियावर माणुसकीची जाणीव करून देणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. पाळीव प्राण्यांचं जसं मोठ्या माणसांशी नातं असतं. त्याचप्रमाणे कितीतरी पटीने  जास्त प्रेम लहान मुलांचे कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांवर असतं. एखाद्या मित्राप्रमाणे लहान मुलं आपल्या घरातील किंवा परिसरातील प्राण्याची काळजी घेतात. नेहमी दिसणारं मांजर किंवा कुत्रा एक दिवस जरी दिसला नाही तरी असवस्थ व्हायला होते. सोशल मीडियावर सध्या दोन चिमुरडी आणि जखमी कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ही दोन लहान मुलं कुत्र्याला झालेल्या जखमेवर तात्पुरते उपचार करत आहेत. वेगवेगळ्या रंगाचे पट्ट्या कुत्र्याच्या जखमेवर लावत आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही मुलांच्या निरागसपणामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.  हा फोटो पाहून अनेकजण भावूकही झाले होते.

हे पण वाचा-

लय भारी! स्वतःचे दागिने विकून 'ती'नं जिम उघडली; अन् काही दिवसात जगप्रसिद्ध झाली, थक्क करणारा प्रवास

लय भारी! जगातील सर्वात वेगवानं भारताचं 'ह्यूमन कॅल्क्युलेटर '; २० वर्षीय नीलकंठने पटकावलं सुवर्णपदक

Web Title: Cat drinking water from cooler in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.