या फोटोत दडलंय मांजर! पाहा तुम्हाला शोधता येतंय का? अनेक नेटिझन्सना सापडलंच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:58 PM2022-07-06T19:58:36+5:302022-07-06T20:02:22+5:30
सोशल मीडियावर सध्या अशाच एका मांजराचा फोटो व्हायरल (Hidden cat viral image) होतो आहे. खरं तर हा एका घराच्या बॅकयार्डचा फोटो आहे, मात्र याच ठिकाणी एक मांजरही दडलंय. या फोटोतील मांजर शोधण्याचा (find cat in backyard) प्रयत्न शेकडो नेटिझन्स करत आहेत.
मांजरी किती अतरंगी आणि मस्तीखोर असतात हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी ज्यांच्या घरी मांजर पाळलेली नाही त्यांनादेखील याबाबत माहिती असेल. इंटरनेटवर मांजरांनी केलेल्या करामतींचे कित्येक व्हिडिओ शेअर (Viral cat videos) होत असतात. यात बऱ्याच वेळा मांजर हे अगदी विचित्र ठिकाणी जाऊन बसलेलं दिसून येतं. कधी घराच्या छतावर, तर कधी छोट्याशा बॉक्समध्ये. मांजरांची ही कुठंही जाऊन बसण्याची सवय त्यांच्या मालकांसाठी मात्र भरपूर डोकेदुखी ठरते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका मांजराचा फोटो व्हायरल (Hidden cat viral image) होतो आहे. खरं तर हा एका घराच्या बॅकयार्डचा फोटो आहे, मात्र याच ठिकाणी एक मांजरही दडलंय. या फोटोतील मांजर शोधण्याचा (find cat in backyard) प्रयत्न शेकडो नेटिझन्स करत आहेत.
‘There is no cat in this image’ नावाचं एक प्रसिद्ध ट्विटर अकाउंट आहे. या अकाउंटवरून अशा प्रकारचे फोटो शेअर केले जातात, ज्यात घरातील मांजर विचित्र ठिकाणी दडलेलं असतं. नेटिझन्स त्या फोटोंमधून दडलेलं मांजर (Find cat hidden in image) शोधतात. या अकाउंटवरून पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये मांजर चट्कन दिसून येतं. मात्र, एक फोटो असा आहे ज्यामध्ये मांजर शोधताशोधता हजारो नेटिझन्सच्या नाकीनऊ आलं आहे. या फोटोला आतापर्यंत सहा हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
काय दिसतंय फोटोमध्ये?
या फोटोमध्ये एका घराचं बॅकयार्ड म्हणजे मागचं अंगण दिसत आहे. यामध्ये एक छोटंसं शेड, व्हीलबॅरो, बाक, कुंड्या अशा गोष्टी दिसत आहेत. मागे एक लाकडी कुंपण आहे. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एका घराचा हा फोटो आहे. या घराच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रिकी’ नावाची मांजर (Ricky cat hide and seek) ही याच फोटोमध्ये कुठेतरी दडली आहे. मात्र, हजारो नेटिझन्सदेखील तिला शोधू शकलेले नाहीत. कित्येकांनी ‘मी हार मानतो’, ‘मांजर नेमकी कशी दिसते हेच मी विसरलो’, ‘बहुतेक ती खिडकीमध्ये आहे’ अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. ही मांजर सापडल्याचा दावादेखील अनेकांनी केला आहे, मात्र त्यांनाही याबाबत खात्री नाही.
हिंट हवीये?
तुम्हीदेखील आतापर्यंत या मांजराला शोधू शकला नसाल, तर थांबा. तुम्हाला आम्ही एक हिंट देतो. या फोटोमध्ये समोरच दिसणाऱ्या व्हीलबॅरोवर झूम करा. या व्हीलबॅरोच्या बाजूने तुम्हाला एक छोटी शेपटी बाहेर आलेली दिसेल. ही शेपटी याच मांजराची आहे. म्हणजेच, हे मांजर व्हीलबॅरोच्या मागे दडलं आहे. बघा बरं परत जाऊन.